मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, पुढे काय झालं?

'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, पुढे काय झालं?

आयपीएल (IPL 2021) स्थगित करण्यात आल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून (Dehli Capitals) खेळणारा मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मुंबईहून गोव्याला जायला निघाला. पण ई-पास (E-Pass) नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अडवलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 मे : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्यात आली, यानंतर सगळे भारतीय खेळाडू त्यांच्या घरी परतले आहेत. आयपीएल स्थगित करण्यात आल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून (Dehli Capitals) खेळणारा मुंबईकर पृथ्वी शॉ मुंबईहून गोव्याला जायला निघाला. कोल्हापूरमार्गे पृथ्वी शॉ गोव्याला जायला निघाला होता, पण त्याच्याकडे ई-पास नव्हता. आंबोलीला पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला अडवलं आणि ई-पासबद्दल विचारलं. ई-पास नसल्यामुळे पृथ्वी शॉ गोंधळला.

पास नसल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी पृथ्वी शॉला पुढे जाण्यास नकार दिला. पासशिवाय पुढे सोडण्यासाठी पृथ्वी शॉने विनंतीही केली, पण पोलिसांनी त्याला सोडायला नकार दिला. अखेर पृथ्वी शॉने त्याच्या मोबाईलवरून पास काढला. एका तासानंतर पृथ्वी शॉला पास मिळाला आणि तो गोव्याकडे जायला निघाला, लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पृथ्वी शॉने यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत तब्बल 827 रन केले होते. स्पर्धेच्या इतिहासात ही सर्वाधिक धावसंख्या होती. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात पृथ्वी शॉने तीनवेळा 150 रनचा टप्पा ओलांडला होता. याशिवाय आयपीएलमध्येही तो शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएलच्या 8 सामन्यांमध्ये त्याने 166.48 च्या स्ट्राईक रेटने 308 रन केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या (India vs England) भारतीय टीममध्ये पृथ्वी शॉची निवड झाली नाही, पण याचकाळात भारतीय टीम श्रीलंकेमध्ये वनडे आणि टी-20 सीरिज खेळण्यासाठी जाणार आहे, त्या भारतीय टीममध्ये पृथ्वी शॉची निवड होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Prithvi Shaw