IPL 2019 : पृथ्वी शॉचा पुन्हा फ्लॉप शो, वर्ल्डकपचं तिकीट मुकणार?

IPL 2019 : पृथ्वी शॉचा पुन्हा फ्लॉप शो, वर्ल्डकपचं तिकीट मुकणार?

मुंबई विरुद्धच्या सामन्यातही पृथ्वीला विशेष चांगले प्रदर्शन करता आले नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांना तेवढी चांगली फलंदाजी करता आली नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांना केवळ 35 धावांची भागीदारी केली. यात शॉनं 24 धावा केल्या यात 5 चौकारांचा समावेश होता. असे असले तरी, शॉकडून जास्त धावांची अपेक्षा होती. मात्र, आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात शॉनं वॉटसनच्या हातात अगदी सहज झेल दिला. भारताचा युवा खेळाडू दीपक चहर यानं शॉची विकेट घेतली. पृथ्वीच्या या फ्लॉप शोमुळं दिल्लीच्या अडचणीत पुढे वाढण्याची शक्यता आहे. यामुळं पृथ्वीचं इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचं तिकीटही मुकण्याची शक्यता आहे.दीपक आणि पृथ्वी भारत अ संघासाठी खेळतात. दिल्लीनं मुंबई विरोधात आपला पहिला सामना जिंकला असला तरी, या सामन्यातही पृथ्वीला विशेष चांगले प्रदर्शन करता आले नाही. सलामीला आलेला पृथ्वी केवळ 7 धावा करत बाद झाला. पृथ्वी मागच्या हंगामापासून दिल्ली संघासोबत आहे. भारताचा कसोटी फलंदाज पृथ्वी शॉनं वयाच्या 18व्या वर्षीच आपल्या फलंदाजीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर पृथ्वीनं 24 मार्च मुंबई इंडियन्स विरोधात आपला पहिला सामना खेळला.


...जेव्हा नवनीत राणा बैलगाडीतून जाऊन भरतात उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या