सरकारनं केली BCCIची कोंडी, पृथ्वी शॉ प्रकरण भोवलं!

सरकारनं केली BCCIची कोंडी, पृथ्वी शॉ प्रकरण भोवलं!

बीसीसीआयनं पृथ्वी शॉवर 8 महिन्यांची बंदी घातली होती, या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानं त्याच्यावर 8 महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीला नोव्हेंबरपर्यंत खेळता येणार नाही. दरम्यान पृथ्वीवर बंदीची कारवाई होण्याआधी सरकारने बीसीसीआय़ला फटकारले होते. डोपिंग टेस्टच्या प्रक्रियेवरून सरकारने बीसीसीआयला खडेबोल सुनावत पत्र लिहलं होतं. यात उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये असलेल्या त्रुटींबद्दल उल्लेख करण्यात आला होता.

पृथ्वी शॉ प्रकरणामुळं बीसीसीआयची झाली कोंडी

बीसीसीआयला पृथ्वी शॉ 16 जुलै रोजी दोषी आढळल्याचं समजलं होतं. त्यानंतर 18 जुलै रोजी शॉनेसुद्धा मान्य केलं. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, बंदी घालण्यासाठी 30 जुलैपर्यंत वाट का बघितली? निवड समितीला याबाबत माहिती होती का? निवड समितीला पृथ्वीच्या बंदीची कुणकुण आधीच लागली होती. मात्र अधिकृतपणे त्यांच्याकडे याची माहिती देण्यात आली नव्हती म्हणजेच बीसीसीआय यामध्ये काहीतरी लपवत आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

वाचा-अखेर BCCI झुकलं! नाडाच्या रडारावर येणार क्रिकेटपटू

खेल मंत्रालयानं अडवला खेळाडूंचा व्हिसा

केंद्र सरकारच्या डोपिंग निर्णयावर बीसीसीआय काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळं खेल मंत्रालयानं त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. याची सुरुवात मंत्रालयानं दक्षिण आफ्रिका ए आणि महिला संघाच्या भारत दौऱ्याची व्हिसा प्रक्रिया रोखली.

खेळाडूंची माहिती लपवणे पडलं महागात

पृथ्वी शॉबद्दल निवड समितीला बीसीसीआयनं अपडेट दिले होते. यात त्याच्याशिवाय आणखी 5 खेळाडूंची माहिती होती. हे पाहता बीसीसीआय़ काही लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. बीसीसीआयनं शिखर धवन फिट असल्याचं सांगितंल होतं. त्याशिवाय इशांत शर्मा, उमेश यादव, विजय शंकर, शार्दुल ठाकुरला दुखापत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्याबद्दल बरीच माहिती देण्यात आली पण पृथ्वीची माहिती एका ओळीत होती.

वाचा-पृथ्वी शॉ प्रकरणी BCCIचा खोटारडेपणा? बंदीपूर्वी संघ निवडीवरून प्रश्नचिन्ह

बीसीसीआयनं अखेर घेतली माघार

क्रिडा मंत्रालयानं ताकीद देऊनही बीसीसीआयनं नाडामध्ये येण्यास नकार दिला होता. बीसीसीआयला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीशी जोड़ण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सरकारसोबत वाद सुरू आहे. देशातील इतर खेळातील खेळाडू नाडा अंतर्गत येतात मात्र बीसीसीआय़ यामध्ये येत नाही. याबाबात बीसीसीआयने म्हटलं होतं की, नाडाच्या प्रक्रियेत अनेक कमतरता आहेत. दरम्यान क्रीडा मंत्रालयानं त्यांच्या पत्रात बीसीसीआयच्या दाव्याला फेटाळून लावलं आहे. दक्षिण आफ्रिका ए आणि महिला संघाच्या सामन्यादरम्यान बीसीसीआयनं ही चाचणी घेण्यास नकार दिला होता. मात्र आता नाडाच्या रडारवर आल्यामुळं खेळाडूंना सावध रहावे लागणार आहे.

वाचा-पृथ्वीवर बंदी, सरकारने BCCIला सुनावले होते खडे बोल

VIDEO : चंद्रकांत पाटील म्हणाले, 'त्या' कामाचं तरी महाजनांचं कौतुक करावं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या