पृथ्वी शॉबाबत मोठी बातमी, बंदी हटवल्यानंतर ‘या’ स्पर्धेतून करणार कमबॅक

पृथ्वी शॉबाबत मोठी बातमी, बंदी हटवल्यानंतर ‘या’ स्पर्धेतून करणार कमबॅक

भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. पृथ्वी शॉवर अंमली पदार्थांचे सेवन केल्या प्रकरणी बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी हटवल्यानंतर पृथ्वी शॉ मुंबईमध्ये होणाऱ्या स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. मुंबईत होणाऱ्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉ खेळताना दिसू शकतो.

मुंबई संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे मिलिंद रेगे यांनी, पृथ्वी शॉवरची बंदी हटवल्यानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. अंमली पदार्थांचे सेवन केल्या प्रकरणी शॉवर 8 महिन्यांची बंदी लादली होती. 15 नोव्हेंबरला शॉवरची बंदी हटवण्यात येणार आहे. त्यामुळं मुश्ताक अली स्पर्धेतून शॉ पुनरागमन करू शकतो.

शॉ लवकरच करणार पुनरागमन

मुंबईच्या निवड समितीच्या प्रमुख मिलिंद रेगे यांनी ESPN Cricinfoला दिलेल्या माहितीत, पृथ्वी शॉच्या निवडीबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले. त्यांनी, “शॉ 16 नोव्हेंबरपासून क्रिकेट खेळू शकतो. तसेच, त्याच्या निवडीबाबत विचार केला जाईल. पृथ्वीच्या निवडीसाठी मी शब्द टाकेन”, असे सांगितले.

वाचा-युवराजचा रेकॉर्ड तोडण्यासाठी रोहितचा तयार होता मास्टरप्लॅन पण...

पृथ्वी शॉचे रेकॉर्ड जबरदस्त

रेगे यांनी यावेळी पृथ्वी शॉचे कौतुक करत, “शॉ एक चांगला खेळाडू आहे. गेल्या वर्षभरात त्यानं मुंबईसाठी चांगली खेळी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याच्या खेळीला पूर्णविराम लागल्यानंतर आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास तो सज्ज आहे”, असे सांगितले. 15 नोव्हेंबरला पृथ्वी शॉची बंदी हटवली जाणआर आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरला मुंबईचा सामना होणार आहे. सैयद मुश्ताक ट्रॉफीच्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात मुंबईचे तीन महत्त्वाचे खेळाडू श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे आता टीम इंडियाकडून खेळत आहेत त्यानंतर सैयद मुश्ताक ट्रॉफीमध्ये खेळतील.

वाचा-IPL : अश्विनने सोडली पंजाबची साथ, आता 'या' खेळाडूकडे नेतृत्व?

पृथ्वी शॉ प्रकरणामुळं बीसीसीआयची झाली होती कोंडी

बीसीसीआयला पृथ्वी शॉ 16 जुलै रोजी दोषी आढळल्याचं समजलं होतं. त्यानंतर 18 जुलै रोजी शॉनेसुद्धा मान्य केलं. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, बंदी घालण्यासाठी 30 जुलैपर्यंत वाट का बघितली? निवड समितीला याबाबत माहिती होती का? निवड समितीला पृथ्वीच्या बंदीची कुणकुण आधीच लागली होती. मात्र अधिकृतपणे त्यांच्याकडे याची माहिती देण्यात आली नव्हती म्हणजेच बीसीसीआय यामध्ये काहीतरी लपवत आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

वाचा-अयोध्या प्रकरणाचे टीम इंडियावर पडसाद! विराट सेनेच्या सुरक्षेत होणार वाढ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 02:28 PM IST

ताज्या बातम्या