Home /News /sport /

पृथ्वी आपल्याच कॅप्टनचा पत्ता कापणार! विराटला मित्राबद्दलच घ्यावा लागणार कठोर निर्णय

पृथ्वी आपल्याच कॅप्टनचा पत्ता कापणार! विराटला मित्राबद्दलच घ्यावा लागणार कठोर निर्णय

स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि मग श्रीलंका दौऱ्यामध्ये धमाकेदार कामगिरी केल्याचं फळ पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) मिळालं आहे. श्रीलंका दौरा संपल्यानंतर पृथ्वी शॉ सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) रवाना होणार आहे.

पुढे वाचा ...
    कोलंबो, 27 जुलै : स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि मग श्रीलंका दौऱ्यामध्ये धमाकेदार कामगिरी केल्याचं फळ पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) मिळालं आहे. श्रीलंका दौरा संपल्यानंतर पृथ्वी शॉ सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) रवाना होणार आहे. पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या खराब कामगिरीनंतर टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला होता. यानंतर पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये धमाका केला. विजय हजारे ट्रॉफीच्या 8 इनिंगमध्ये त्याने विक्रमी 827 रन केले. लिस्ट ए क्रिकेटच्या 20 इनिंगमध्ये त्याने 72.94 च्या सरासरीने 1,240 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. पृथ्वी शॉने त्याच्या या कामगिरीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीचा (T20 World Cup) आपला दावा आणखी पक्का केला आहे. निवड समिती आणि कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) जर पृथ्वी शॉला वर्ल्ड कपसाठी निवडण्याचा निर्णय घेतला तर मात्र सध्या श्रीलंका दौऱ्यात कर्णधार असलेल्या शिखर धवनची (Shikhar Dhawan) जागाच धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिखर धवन आणि विराट कोहली यांनी एकत्रच दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळलं, पण विराट कोहलीने क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवलं, तर शिखर धवनला वनडे वगळता टेस्ट आणि टी-20 फॉरमॅटमध्ये संघर्ष करावा लागला. श्रीलंका दौऱ्यात नवोदितांना संधी दिल्यामुळे आणि टीमचे प्रमुख खेळाडू इंग्लंडला असल्यामुळे शिखर धवनला टीमचं नेतृत्व देण्यात आलं. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये पहिला सामना झाल्यानंतर धवनला टीमबाहेर करण्यात आलं. तसंच टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम संतुलनासाठी आपणही ओपनर म्हणून खेळू शकतो, याचे संकेत विराट कोहलीने दिले. याच कारणासाठी विराट आयपीएलमध्येही ओपनिंगला खेळला. रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला विराट कोहली, केएल राहुल (KL Rahul) आणि पृथ्वी शॉ हे तीन पर्याय तयार झाले असताना आता शिखर धवनचं टेन्शन मात्र वाढण्याची शक्यता आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Prithvi Shaw, Shikhar dhawan, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या