भारताला मोठा धक्का; पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी, BCCIनं घातली बंदी

भारताला मोठा धक्का; पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी, BCCIनं घातली बंदी

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : भारतीय क्रिकेटचा उगवता तारा पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी आढळळा असून त्याच्यावर 15 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याआधी शॉ दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. त्यामुळेच त्याला विंडीज दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. इंदौरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी पृथ्वी शॉच्या यूरीनचे सॅम्पल घेण्यात आलं होतं. त्यात बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याचं आढळलं आहे. बीसीसीआयच्या अँटी डोपिंग प्रोग्रॅम अंतर्गत ही चाचणी करण्यात आली होती.

पृथ्वी शॉच्या यूरीन सॅम्पलमध्ये बंदी असलेल्या पदार्थाचा अंश आढळला. टर्ब्यूटलाइन नावाचा हा पदार्थ कफ सिरपमध्ये वापरला जातो. या पदार्थाच्या सेवनावर वाडाने बंदी घातली आहे.

बीसीसीआयने जाहीर केलं आहे की, 16 जुलै 2019 रोजी पृथ्वी शॉने अँटी डोपिंग रूल व्हायलेशन आणि बीसीसीआय़आच्या अँटी डोपिंग रूलचे उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. पृथ्वी शॉने आपण या पदार्थाचं सेवन केल्याचं मान्य केलं. मात्र, त्याचा वापर केवळ खोकला थांबावा या उद्देशानेच केल्याचं म्हटलं आहे. बीसीसीआयनं त्याचं म्हणणं मान्य केलं तरी त्याच्या बेजबाबदारपणामुळे 8 महिन्याची बंदी घातली असल्याचं सांगितलं. पृथ्वी शॉवर 16 मार्च ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

डोपिंग म्हणजे काय?

डोपिंग टेस्ट ही प्रशिक्षण शिबिरात किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यापूर्वी घेतली जाते. मेक्सिको ऑलिम्पिक वेळी 1968 मध्ये पहिल्यांदाच भारतात डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. स्टेरॉयड, पेप्टाइड हार्मोन, नार्कोटिक्स, डाइयूरेटिक्स आणि ब्लड डोपिंग या 5 प्रकारच्या उत्तेजक घेण्याचा यात समावेश आहे.

दोषी आढळल्यास काय़?

खेळाडूच्या युरीनचे नमुने तपासून त्यात पॉझिटीव्ह आढळल्यास खेळाडूवर बंदी घालण्यात येते. त्यानंतर खेळाडू बी टेस्ट देऊ शकतो. मात्र, त्यातही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास खेळाडू स्पर्धेतून बाद केला जातो. वाडा म्हणजे विश्व डोपिंग संस्था आणि नाडा म्हणजे राष्ट्रीय डोपिंग संस्था यांच्याकडून ही टेस्ट घेण्यात येते.

Truecaller वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचली का? तुमच्याकडून परस्पर पाठवला गेलाय SMS!

इतिहास घडला, तिहेरी तलाक यापुढे गुन्हा; ऐतिहासिक विधेयकाला राज्यसभेची मंजुरी!

घाटात जोरदार पावसात 'डेंजर ड्रायव्हिंग'चा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Published by: Suraj Yadav
First published: July 30, 2019, 8:57 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading