मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI सोबत वाद, विराटच नाही तर रोहितही टेन्शनमध्ये, एक चूक पडेल महाग!

BCCI सोबत वाद, विराटच नाही तर रोहितही टेन्शनमध्ये, एक चूक पडेल महाग!

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. विराटऐवजी रोहित शर्माला (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात आली आहे, पण यामुळे विराट आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातला वाद समोर आला आहे.

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. विराटऐवजी रोहित शर्माला (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात आली आहे, पण यामुळे विराट आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातला वाद समोर आला आहे.

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. विराटऐवजी रोहित शर्माला (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात आली आहे, पण यामुळे विराट आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातला वाद समोर आला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. विराटऐवजी रोहित शर्माला (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात आली आहे, पण यामुळे विराट आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातला वाद समोर आला आहे. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं पण तरीही तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितलं. विराटने मात्र गांगुलीचा हा दावा खोडून काढला, आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही. तसंच टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी तुला वनडे टीमचा कॅप्टन म्हणून काढून टाकण्यात आलं आहे, असं सांगण्यात आल्याचं विराट म्हणाला.

बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यातल्या या वादामुळे सगळ्यांवरचा दबाव वाढला आहे. कोहलीने मागच्या दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक केलेलं नाही, जर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही (India vs South Africa) तो अपयशी ठरला तर बोर्डाची नजर त्याच्यावर असेल. दुसरीकडे रोहित शर्माला वनडे टीमचा कॅप्टन करण्यात आलं आहे, त्यामुळे त्याच्यावरही कायमच विजयासाठी दबाव असेल, त्यामुळे रोहित आणि विराटसाठी पुढचा काळ अडचणीचा असू शकतो.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. पूर्णवेळ कर्णधार होण्याआधी रोहितने भारताचं 19 टी-20 आणि 10 वनडेमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व केलं होत. पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्याच सीरिजमध्ये रोहितने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 3-0 ने पराभव केला. पण कोहलीपेक्षा एक वर्ष मोठा असलेल्या रोहितच्या फिटनेसने बीसीसीआयचीही चिंता वाढवली आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे.

रोहित शर्मा पुढच्या दोन वर्षात दोन वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व करेल. टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे, तर वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साली भारतात होईल. मायदेशात वर्ल्ड कप होणार आहे, याच कारणामुळे विराटला वनडे टीमचं कॅप्टन म्हणून कायम राहायचं होतं. कर्णधार म्हणून विराटला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. रोहितला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रन तर करावेच लागतील, पण विजयही मिळवून द्यावा लागेल.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup 2021) विराट कोहली आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, 'बैठकीमध्ये सौरव गांगुलीने कोहलीला टी-20 च्या कॅप्टन्सीवरून हटण्याबाबत सांगितलं होतं, यावेळी निवड समितीचे सदस्यही होते. गांगुलीने कोहलीला फायदा आणि नुकसानाबाबतही सांगितलं होतं, पण बीसीसीआयने याबाबत काही सांगायच्या आधीच विराटने सोशल मीडिया पोस्ट करून टी-20 टीमच्या राजीनाम्याची घोषणा केली.'

अनेक जण विराटला जास्त पॉवरफूल व्यक्ती म्हणून बघत होते. कोहलीमुळेच अनिल कुंबळेला (Anil Kumble) पदावरून राजीनामा द्यावा लागला. कोहलीने टी-20नंतर वनडेची कॅप्टन्सी न सोडून बीसीसीआयला आव्हान दिलं होतं. अखेर बोर्डाने विराटला वनडे कॅप्टन्सीवरूनही हटवलं.

First published:

Tags: BCCI, Rohit sharma, Team india, Virat kohli