IPL 2019 : प्रिती झिंटाला मोठा धक्का, 8.4 कोटी पाण्यात

IPL 2019 : प्रिती झिंटाला मोठा धक्का, 8.4 कोटी पाण्यात

प्रिती झिंटाच्या संघानं एक नवख्या खेळाडूला 8.4 कोटींना आपल्या संघात घेतलं. मात्र, तोच झाला संघा बाहेर.

  • Share this:

मोहाली, 16 एप्रिल : आयपीएलला 2008पासून सुरुवात झाली. दरम्यान पहिल्या हंगामापासून आजतागायत अनेक युवा खेळाडू आयपीएलमुळं भारतीय संघाला मिळाले. दरम्यान असेच काहिसे खेळाडू आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या लिलावात गाजले. जे प्रथम श्रेणी क्रिकेटमधले शेर होते. त्यानं कोट्यावधी रुपये देऊन आयपीएलमधल्या संघ मालकांनी विकत घेतले. त्यातला या हंगामात सर्वात जास्ता गाजला तो वरूण चक्रवर्ती.

मिस्ट्रीमॅन या नावानं चर्चेत असणाऱ्या वरुणनं प्रथम श्रेणीत उत्तम गोलंदाजी करत आपलं स्थान आयपीएलच्या बाराव्या हंगामात मिळवलं. प्रिती झिंटाच्या संघानं तर, त्याला तब्बल 8.4 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतलं. मात्र, एक दैवदुर्विलास प्रकार घडला आहे.

कारण ज्या खेळाडूसाठी जवळपास साडे आठ कोटी रुपये मोजले, पण त्या खेळाडूला आता आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे प्रितीसह कर्णधार आर अश्विनलाही मोठा धक्का बसला आहे.

पंजाबनं वरुणला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळण्याची पहिली संधी दिली होता. या सामन्यात या मागड्या खेळाडूने 35 धावा देत एक बळी मिळवला होता. या सामन्यात त्याने कोलकाताचा धडाकेबाज सलामीवीर सुनील नरिनला बाद केले होते. त्यानंतर या खेळाडूला एकही सामना खेळता आलेला नाही. दरम्यान चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी या खेळाडूच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला यापुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.

पंजाबचा आज सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोहाली येथे होणार आहे. मोहाली येथे झालेल्या गेल्या सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळं पंजाबला हा सामना जिंकावाच लागणार आहे.

VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस

First published: April 16, 2019, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading