IPL 2019 : प्रिती झिंटानं केएल राहुलबद्दल केला मोठा खुलासा

IPL 2019 :  प्रिती झिंटानं केएल राहुलबद्दल केला मोठा खुलासा

केएल राहुल सध्या प्रिती झिंटाच्या पंजाब संघाकडून खेळत असून, त्यांन 4 सामन्यात 91 धावा केल्यात.

  • Share this:

मोहाली, 6 एप्रिल : किंग्ज एलेव्हन पंजाबची सह-मालकीन प्रिती झिंटा आपल्या संघाला चिअर करण्यासाठी नेहमीच मैदानावर हजर असते. आता मात्र प्रितीनं एक मोठा खुलासा केला आहे. 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या टॉक शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर टिकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांच्यावर बीसीसीआयनं निलंबनाची कारवाई केली होती. आता या सगळ्या वादात प्रितीनं उडी घेत, केएल राहुलची प्रशंसा केली आहे.

एका कार्यक्रमात प्रितीनं राहुल महिलांचा खुप सन्मान करतो. ही दुदैवी गोष्ट आहे की एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे सांगितले. सध्या पांड्या आणि राहुल यांची बीसीसीआयची लोकपालांकडून चौकशी सुरू आहे. तरी, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई हटवल्यामुळं ते दोघही आयपीएल खेळत आहे. राहुल सध्या प्रिती झिंटाच्याच पंजाब संघाकडून खेळतो.

यामुळं आपल्या खेळाडूची बाजू घेत प्रितीनं, राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याचा फायदा संघाला होत आहे. जे झालं ते झालं. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात खुप काही शिकवतात. पंजाब संघाकडून राहुलनं 4 सामन्यात 91 धावा केल्या आहेत. आज पंजाबचा संघ चेन्नई विरोधात भिडणार आहे.

VIDEO: माझं नाव आफताब जहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो

First published: April 6, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading