IPL 2019 : कोण आहे 'हा' 16 वर्षांचा खेळाडू, ज्याला कोहलीनं दिली 'विराट' संधी

IPL 2019 : कोण आहे 'हा' 16 वर्षांचा खेळाडू, ज्याला कोहलीनं दिली 'विराट' संधी

शेन वॉर्नची गोलंदाजी पाहून आणि गांगुलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन हा बंगालचा खेळाडू आयपीएल गाजवण्यास सज्ज झाला आहे.

  • Share this:

हैदराबाद, 31 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे बिगुल वाजायला सुरूवात झाली असताना, अवघ्या काही दिवसांतच अनेक घडामोडींनी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले. या सगळ्यात आकर्षण ठरले ते युवा खेळाडू. मग बंगळुरूकडून खेळणारा शिवम दुबे असो की, कोलकाताकडून खेळणारा निखिल नाईक किंवा मुंबईकडून पर्दापण करणारा काश्मिरचा रसिख सलाम. या सगळ्या युवा खेळाडूंमध्ये आता आणखी एका नावाची भर पडत आहे. तो म्हणजे बंगालचा 16 वर्षीय खेळाडू प्रयार रे बर्मन.

केवळ 20 लाख बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला बंगळुरूनं 1.5 कोटी देऊन आपल्या संघात सामिल केले.

केवळ 20 लाख बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला बंगळुरूनं 1.5 कोटी देऊन आपल्या संघात सामिल केले.

प्रयास आज हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात बंगळुरू संघाकडून पर्दापण करत आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात प्रयास हा खेळाडू चांगलाच गाजला. कारण प्रयास हा सर्वात लहान खेळाडू ठरला, जो आयपीएलच्या लिलावात सामिल झाला होता. प्रथम श्रेणीतील त्याच्या उत्कृष्ठ गोलंदाजीमुळं थेट विराटनं प्रयासची शिफारस केली आणि बंगळुरूच्या ड्रेसिंग रुममध्ये त्याला स्थान मिळाले. बंगालकडून प्रथम श्रेणीत खेळणाऱ्या या खेळाडूची लिलावातील बेस प्राईज केवळ 20 लाख होती. पण त्याच्या फिरकी गोलंदाजीवर बंगळुरू संघांलाही राहावले नाही, आणि त्यांनी प्रयासला 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रयासनं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न यांचे व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच  प्रयासच्या या आवडीचे रुपांतर प्रेमात झाले. शेन वॉर्नच्या गोलंदाजीच्या प्रभावानं प्रयासनं क्रिकेट शिकण्यास सुरूवात केली.

खरतर सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्या वादाचा काही अंशी परिणाम प्रयासच्या क्रिकेटमध्ये येण्याच्या निर्णयावर झाला. कारण चॅपला यांच्याशी झालेल्या वादानंतर गांगुली यांना संघातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळं प्रयासच्या घरात केवळ एकच विषय असायचा, जर गांगुली नाही तर भारतीय संघात बंगालचे प्रतिनिधित्व कोण करणार. त्यानंतर प्रयासनं भारतीय संघात सामिल होण्याच जणु निश्चयच केला. त्यानंतर केवळ 15व्या वर्षी प्रयासनं रणजी करंडकमध्ये पर्दापण केलं. बंगालच्या अंडर-17 संघाचा प्रयास हा प्रमुख गोलंदाज आहे. तर, विजय हजारे ट्रॉफीमध्ये पर्दापणातच प्रयास हा 4.4 इकॉनॉमीने बंगालकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. खरतरं गांगुलीनंतर कोणत्याच बंगाली खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केलेला नाही. त्यामुळं प्रयासकडून बंगालच्या जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्याच विराट कोहलीच्याही आहेत.VIDEO: ट्राफिकच्या भीतीने संरक्षणमंत्र्यांनी मेट्रोतून केला प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या