...म्हणून IPLच्या कामगिरीचा वर्ल्ड कप संघ निवडीशी संबंध नाही- प्रसाद

...म्हणून IPLच्या कामगिरीचा वर्ल्ड कप संघ निवडीशी संबंध नाही- प्रसाद

सध्या भारतीय संघात तीन स्थानांसाठी चुरस आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : एकीकडं आयपीएलचं ज्वर वाढत असताना, दुसरीकडं विश्वचषकासाठी कोणत्या 11 खेळाडूंची वर्णी लागणार याचीही चाहत्यांमध्ये तेवढीच उत्सुकता आहे. तर, ३० मे रोजी इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकसाठी बीसीसीआयनं आणि निवड समितीनं आपली कंबर कसली आहे.

बीसीसीआयची निवड समिती १५ एप्रिल रोजी मुंबईत विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करणार आहे. या पार्श्वभूमीवर आता एक मोठा खुलासा निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांनी, कोणत्याही खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीचा विश्वचषकातील संघ निवडीशी संबंध नसेल, असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही खेळाडूची आयपीएलमधली कामगिरी विश्वचषकासाठी संघ निवडताना ग्राह्य धरली जाणार नाही. मात्र एखाद्या खेळाडूची आयपीएलमधील दमदार कामगिरी रिक्त जागेसाठी निर्णयाक ठरु शकते. मात्र याची खात्री देता येत नाही, असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

वाचा- तारीख ठरली ! 'या' दिवशी होणार वर्ल्ड कपसाठी 'विराट' सेनेची घोषणा

प्रसाद यांच्या आधी भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा यानं देखील, आयपीएलमधील कामगिरी ही विश्वचषकाच्या संघ निवडीचा निकष ठरू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. तसंच, टी-२० षटकांच्या स्पर्धेतल्या कामगिरीचे निकष वन-डे क्रिकेटच्या कामगिरीसाठी लावणं अयोग्य असल्याचंही रोहित म्हणाला.

दरम्यान संघातील केवळ चौथ्या क्रमांकाची जागा वगळता बाकी सर्व जागांसाठी शिलेदार निश्चितच आहेत, आता त्यांची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. सध्या भारतीय संघात तीन स्थानांसाठी चुरस आहे. त्यात प्रामुख्याने मधल्या फळीतील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, एक अतिरिक्त जलदगती गोलंदाज किंवा फिरकीपटू आणि अतिरिक्त यष्टिरक्षक या जागा चर्चेचा विषय आहेत. दरम्यान याआधी कर्णधार विराट कोहलीनं विश्वचषकासाठीचा संघ निश्चित असल्याचे संकेत दिले होते.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 10, 2019, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading