मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

प्रणव धनावडे आला समोर, सांगितलं चूक कुठे झाली, अर्जुनला म्हणाला...

प्रणव धनावडे आला समोर, सांगितलं चूक कुठे झाली, अर्जुनला म्हणाला...

पाच वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने (Pranav Dhanawade) क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. 2016 साली फक्त 15 वर्षांच्या प्रणवने शालेय क्रिकेटच्या फक्त एकाच सामन्यात तब्बल 1009 रन केले होते.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 जून : पाच वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने (Pranav Dhanawade) क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. 2016 साली फक्त 15 वर्षांच्या प्रणवने शालेय क्रिकेटच्या फक्त एकाच सामन्यात तब्बल 1009 रन केले होते. 323 बॉलच्या या ऐतिहासिक खेळीमध्ये त्याने 59 सिक्स आणि 127 फोर लगावले. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. प्रणवच्या या खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक झालं. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) प्रणवला पाहून प्रभावित झाला होता. एवढच नाही तर सचिनने त्याला घरीही बोलावलं.

त्या एका खेळीनंतर मात्र प्रणव धनावडे फार चर्चेत आला नाही. आता मात्र प्रणव समोर आला आहे आणि त्याने नेमक्या काय चुका झाल्या याबाबत भाष्यं केलं आहे. क्रिकेटकंट्रीसोबत प्रणव बोलत होता.

'रेकॉर्ड केल्यानंतर अपेक्षा फार वाढल्या होत्या. प्रत्येक वेळी मी बॅटिंगला जायचो, तेव्हा माझ्यावर दबाव यायचा. माझ्यासाठी हे खूप कठीण झालं, कारण अनेकवेळा माझं लक्ष भरकटलं आणि मी खराब शॉट मारले,' असं प्रणव म्हणाला. तसंच सचिनने आपल्याला घरी बोलावलं आणि त्याच्याकडे असलेली बॅट मला गिफ्ट म्हणून दिली, अशी आठवणही प्रणवने सांगितली.

सचिन तेंडुलकरनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी शालेय क्रिकेटमध्ये खूप रन केले होते. शालेय क्रिकेटमधल्या एका सामन्यात सचिनने 329 रनची खेळी केली होती. या खेळीमध्ये सचिन आणि विनोद कांबळी यांनी 664 रनची पार्टनरशीप केली होती.

'मी अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) मित्र आहे. माझ्या खेळीनंतर सचिनने मला घरी बोलावलं. माझ्यासाठी हे एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखं होतं. सचिनने मला एक बॅट दिली आणि शुभेच्छाही दिल्या,' असं प्रणव म्हणाला.

कल्याणमध्ये रिक्षाचालकाचा मुलगा असणाऱ्या प्रणवने केसी गांधी इंग्लिश स्कूलकडून खेळताना 1009 रन केले होते. याचसोबत त्याने एईजे कॉलिन्स यांचा 117 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. 1899 साली इंग्लंडच्या शालेय क्रिकेटमध्ये कॉलिन्स यांनी 628 नाबाद रनची खेळी केली होती.

प्रणव धनावडेने टीम इंडियाचा ओपनर पृथ्वी शॉचा विक्रमही मोडित काढला. शॉने शालेय क्रिकेटमध्ये 2013 साली 546 रन केले होते. प्रणवला एयर इंडियाने स्कॉलरशीपही दिली होती, पण प्रणवला त्याच्या या कामगिरीनंतर फार यश मिळवता आलं नाही, पण प्रणव अजूनही सीनियर क्रिकेटमध्ये खेळण्याची वाट पाहत आहे.

First published:

Tags: Arjun Tendulkar, Cricket, Sachin tendulkar