Tokyo Olympic : बस ड्रायव्हरच्या मुलीला ऑलिम्पिकचं तिकीट, स्वप्न भारतासाठी मेडल जिंकण्याचं!

पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणाऱ्या प्रणती नायक (Pranati Nayak) हिला टोकयो ऑलिम्पिकचं (Tokyo Olympics) तिकीट मिळालं आहे.

पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणाऱ्या प्रणती नायक (Pranati Nayak) हिला टोकयो ऑलिम्पिकचं (Tokyo Olympics) तिकीट मिळालं आहे.

  • Share this:
    कोलकाता, 8 जुलै : पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणाऱ्या प्रणती नायक (Pranati Nayak) हिला टोकयो ऑलिम्पिकचं (Tokyo Olympics) तिकीट मिळालं आहे. 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत प्रणती भारताची एकमेव महिला जिमनॅस्ट आहे. प्रणतीने उलानबटारमध्ये आयोजित 2019 आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. कोरोना व्हायरसमुळे नवीनतम आशियाई चॅम्पियनशीपला रद्द करण्यात आलं होतं, त्यामुळे 2019 चॅम्पियनशीपच्या आधारावर टोकयो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना कोटा देण्यात आला. प्रणती नायकने आशियाई उपखंडाचा कोटा मिळवला. 6 एप्रिल 1995 साली जन्मलेली प्रणतीने एनसडबल्यू स्कूल ऑफ लॅन्गवेजमध्ये शिक्षण घेतलं. तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकलं आहे. सध्या प्रणती टोकयो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेल प्राधिकरण (SAI) कॉम्प्लेक्स कोलकातामध्ये सराव करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ती बायो-बबलमध्ये आहे. बाहेरच्या लोकांना भेटण्याची परवानगी प्रणतीला नाही. प्रणतीचे प्रशिक्षक लेखन शर्मा यांना तिला पदक मिळेल, याचा विश्वास आहे. pranati nayak gymnast in tokyo olympics प्रणतीचे वडील श्रीमंत नायक बस ड्रायव्हर आहेत, तर आई प्रतिमा गृहिणी आहे. प्रणती त्यांची सगळ्यात लहान मुलगी आहे. लहानपणापासूनच प्रणतीला खेळात उर्जा आहे. छोटी असतानाही ही इकडे-तिकडे उड्या मारायची, अशी तिची आई सांगते. प्रणतीच्या या उर्जेला नंतर मार्ग दाखवण्यात आला. तिने अनेक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. प्रणतीचा प्रशिक्षक असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं तिचे प्रशिक्षक लेखन शर्मा म्हणाले. टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं प्रणतीचं स्वप्न आहे. 'लोकांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी खूप आभारी आहे. देशासाठी पदक जिंकण्यासाठी मी कठोर मेहनत करत आहे,' अशी प्रतिक्रिया प्रणतीने दिली. प्रणती पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. महिला ऑल-राऊंड इव्हेंटमध्ये खेळणार आहे.
    Published by:Shreyas
    First published: