मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Paralympics मध्ये भारताला चौथं गोल्ड, प्रमोद भगतने इतिहास घडवला

Tokyo Paralympics मध्ये भारताला चौथं गोल्ड, प्रमोद भगतने इतिहास घडवला

भारताचा शटलर प्रमोद भगत (Pramod Bhagat) याने टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) इतिहास घडवला आहे. बॅडमिंटन सिंगल्स एसएल-3 स्पर्धेत प्रमोद भगतला गोल्ड मेडल (Gold Medal) मिळालं आहे.

  • Published by:  Shreyas

टोकयो, 4 सप्टेंबर : भारताचा शटलर प्रमोद भगत (Pramod Bhagat) याने टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) इतिहास घडवला आहे. बॅडमिंटन सिंगल्स एसएल-3 स्पर्धेत प्रमोद भगतला गोल्ड मेडल (Gold Medal) मिळालं आहे. भारताचं टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेतलं हे चौथं गोल्ड मेडल आहे. बॅडमिंटन सिंगल्समध्ये (Badminton Singles) पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच गोल्ड मेडल जिंकलं.

याच इव्हेंटमध्ये भारताच्याच मनोज सरकारने (Manoj Sarkar) ब्रॉन्झ मेडल (Bronze Medal) पटकावलं. यासह भारताची टोकयो पॅरालिम्पिकमधल्या मेडलची संख्या 17 झाली आङे. आतापर्यंतच्या पॅरालिम्पिकमधली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जगातला नंबर-1 पॅरा शटलर प्रमोद भगतने फायनलमध्ये ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला 21-14, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हा सामना प्रमोदने फक्त 36 मिनिटांमध्येच जिंकला. तर मनोज सरकारने ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये जपानच्या दायसुके फुजिहाराचा 22-20, 21-13 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

ओडिसाच्या 33 वर्षांच्या भगतने पहिल्या गेममध्ये आघाडी घेत 21-14 ने विजय मिळवला, यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्याला प्रतिस्पर्ध्याने आव्हान दिलं. बेथेलने 5-1 ची आघाडी घेतली, ही आघाडी बेथलने 11-4 पर्य़ंत पुढे नेली, पण भगतने लागोपाठ 6 पॉईंट्स घेून स्कोअर 10-12 केला. यानंतर त्याने 15-15 ने बरोबरी साधली आणि मग आघाडी घेत दुसरा गेम 21-17 ने जिंकून गोल्ड मेडलवर कब्जा केला.

प्रमोद भगतला वयाच्या पाचव्या दिवशी पोलियो झाला होता. प्रमोद जगातल्या सर्वोत्तम पॅरा-शटलरपैकी एक आहे, त्याने आत्तापर्यंत 45 आंतरराष्ट्रीय पदक जिंकली, यामध्ये चार वर्ल्ड चॅम्पियनशीपची गोल्ड मेडल आणि 2018 आशियाई पॅरा खेळांमध्ये एक गोल्ड आणि एक ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे.

First published: