मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दिवसभर रेल्वेत नोकरी, नियमित 7 तास सराव, पॉवर लिफ्टिंगमध्ये Championship मिळवणारी ममता कसं करते मॅनेज?

दिवसभर रेल्वेत नोकरी, नियमित 7 तास सराव, पॉवर लिफ्टिंगमध्ये Championship मिळवणारी ममता कसं करते मॅनेज?

ममता असं या खेळाडूचं नाव आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे विभागाची कर्मचारी असलेल्या ममतानं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या इंटर रेल्वे पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचं (Inter Railway Power Lifting Championship) विजेतेपद जिंकलं आहे. सध्या बिकानेर डिव्हिजनमधील भिवानी रेल्वे स्थानकावर ममताचं (Mamta) पोस्टिंग आहे.

ममता असं या खेळाडूचं नाव आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे विभागाची कर्मचारी असलेल्या ममतानं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या इंटर रेल्वे पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचं (Inter Railway Power Lifting Championship) विजेतेपद जिंकलं आहे. सध्या बिकानेर डिव्हिजनमधील भिवानी रेल्वे स्थानकावर ममताचं (Mamta) पोस्टिंग आहे.

ममता असं या खेळाडूचं नाव आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे विभागाची कर्मचारी असलेल्या ममतानं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या इंटर रेल्वे पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचं (Inter Railway Power Lifting Championship) विजेतेपद जिंकलं आहे. सध्या बिकानेर डिव्हिजनमधील भिवानी रेल्वे स्थानकावर ममताचं (Mamta) पोस्टिंग आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेट कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं काही दिवस रेल्वेमध्ये टीसीची नोकरी करताकरता क्रिकेट खेळलं होतं, ही गोष्ट एव्हाना सर्वांना माहिती झाली आहे. कधीकाळी एम. एस. धोनी आपला कर्मचारी होता, या गोष्टीचा आजही रेल्वेला अभिमान आहे. धोनीप्रमाणेचं आणखी एक महिला खेळाडू आहे, जिच्यामुळे नॉर्थ वेस्टर्न रेल्वे विभागाची (Northwestern Railway Division) मान अभिमानानं उंचावली आहे. ममता असं या खेळाडूचं नाव आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे विभागाची कर्मचारी असलेल्या ममतानं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या इंटर रेल्वे पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचं (Inter Railway Power Lifting Championship) विजेतेपद जिंकलं आहे. सध्या बिकानेर डिव्हिजनमधील भिवानी रेल्वे स्थानकावर ममताचं (Mamta) पोस्टिंग आहे.

तीन भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या ममताचं बालपण पंजाबमधील लुधियानामध्ये (Ludhiana) गेले. तिचे वडील व्यापारी आहेत तर आई घर सांभाळते. तिच्या आई-वडिलांनी ममताला कायम प्रोत्साहन दिलं. ममता शाळेत असताना बेसबॉल (Baseball) खेळायची. तिसऱ्या इयत्तेत असल्यापासून ममता विविध खेळांमध्ये भाग घेत होती. बेसबॉल खेळत असताना तिनं शालेय स्तरावरील राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवला होता. बेस बॉलशिवाय तिनं शॉर्ट पुट आणि लाँग जंपमध्येही भाग घेतलेला आहे. मात्र, 2008 मध्ये जेव्हा ती कॉलेजमध्ये गेली तेव्हा त्या ठिकाणी बेस बॉल खेळाचा पर्याय नव्हता. म्हणून तिनं पॉवर लिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला. हा वैयक्तिक खेळ असल्याने ममताने त्याला जास्त प्राधान्य दिलं. या खेळामध्ये तिनं अनेक ट्रॉफी जिंकल्या. त्यामुळे ममताला स्पोर्ट्स कोट्यातून (Sports quota) 2015 मध्ये रेल्वेत नोकरी (Railway Job) मिळाली. तेव्हापासून तिनं रेल्वे संघासाठी अनेक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे, अशी माहिती 32वर्षीय ममतानं दैनिक भास्करला दिली.

ममतानं आपली नोकरी आणि खेळ यामध्ये कमालीचं संतुलन ठेवलं आहे. नोकरी करताना आपल्या खेळाकडं दुर्लक्ष होणार नाही याची ती काळजी घेते. कठोर परिश्रमाच्या बळावर तिनं 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) सिल्व्हर मेडल (Silver medal) जिंकलं होतं. त्यानंतर राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या तिसऱ्या आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतपदही जिंकलं होतं. 84 प्लस वजनी गटातील इंटर रेल्वे चॅम्पियनशिप जिंकली. जानेवारी 2022 मध्ये होणाऱ्या नॅशनल गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकण्याकडं तिचं लक्ष आहे. इंटर रेल्वे चॅम्पियनशिपमध्ये ममतानं 566 किलो वजन उचलून विजय मिळवला. जोधपूरमध्ये सीटीआय म्हणून काम करणाऱ्या तिच्या टीम मॅनेजर जेनिस जोसेफ या स्वत:ही पॉवर लिफ्टर आहेत. ममता खूपच कष्टाळू असल्याचं जेनिस सांगतात.

आजपासून Pro Kabaddi चा थरार, वाचा स्पर्धेतील सर्व महत्त्वाचे नियम

आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी ममता दिवसातील सात तास सराव करते. सकाळी चार तास धावणे आणि इतर व्यायाम ती करते. ग्राउंड वर्क आणि रनिंग आटोपल्यावर ती घरातील कामे करून, स्वयंपाक करून ऑफिसला जाते. तिथे ममता यूटीएस तिकीट काउंटरवर ड्युटी करते. ड्युटीनंतर सायंकाळी तीन तास ती वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस करते.

या सर्व सरावामध्ये वजन कमी-जास्त करण्यासाठी सर्वात जास्त कष्ट पडतात, असं ममता सांगते. विविध वजनी गटांमध्ये भाग घेण्यासाठी कधी वजन वाढवावं लागतं तर कधी कमी करावं लागतं. आफ्रिकेतील कॉमनवेल्थ गेम्समध्ये 74 किलो वजनी गटात खेळण्यासाठी तिला 6 किलो वजन कमी करावं लागलं होतं. तर इंटर रेल्वे चॅम्पियनशीपमध्ये 84 प्लस वजनी गटात खेळण्यासाठी 10 किलो वजन वाढवावं लागलं. सध्या तिनं आपलं वजन 86 मेटेंन केलं आहे. नॅशनल खेळण्यासाठी तिला हेचं वजन मेटेंन ठेवावं लागणार आहे.

खेळाडूच्या आयुष्यात प्रॅक्टिससोबतच डाएटलादेखील (Diet) खूप महत्त्व आहे. कोच सुनील कुमार यांनी दिलेला डाएट प्लॅन ममता अत्यंत काटेकोरपणे फॉलो करते. तिच्या खाण्यापिण्याचा वेळाही ठरलेल्या आहेत. जर कोचनं सकाळी पाच वाजता प्रोटिन शेक पिण्यास सांगितलं आहे तर तिला प्यावचं लागतं, अशी माहिती ममतानं दिली.

कितने आदमी थे! शोलेतील प्रसिद्ध डायलॉगवर टीम इंडियाच्या 'गब्बर' चा अभिनय, VIDEO

नोकरी सांभाळून नियमित सराव करणं, ही नक्कीच कठीण गोष्ट आहे. मात्र, खेळाची आवड असलेल्या ममतानं आपल्या कष्टांच्या बळावर कठीण गोष्ट साध्य करून दाखवली आहे. म्हणूनचं तिला तिच्या ऑफिसमधील सहकारी कौतुकानं 'पहिलवान' म्हणतात.

First published:

Tags: MS Dhoni, Sport