मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup 2022 : भारतविरुद्धच्या सामन्याआधीच पाकिस्तानला झटका, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीबाबत मोठी बातमी समोर

Asia Cup 2022 : भारतविरुद्धच्या सामन्याआधीच पाकिस्तानला झटका, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीबाबत मोठी बातमी समोर

शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या दुखापत झाली आहे. तसेच अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही.

शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या दुखापत झाली आहे. तसेच अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही.

शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या दुखापत झाली आहे. तसेच अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही.

    मुंबई, 12 ऑगस्ट : यूएईमध्ये सुरू होत असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे शाहिन आफ्रिदी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर असू शकतो. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने हे मान्य केले आहे. शाहीन आफ्रिदीला गुडघ्याची दुखापत -  शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या दुखापत झाली आहे. तसेच अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट संघ शाहीन आफ्रिदीला फिट होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. बाबर आझम म्हणाला की, आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत. तसेच आमचे डॉक्टर शाहीन आफ्रिदीची पूर्ण काळजी घेत आहेत. आफ्रिदीला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी विश्रांतीची गरज आहे. तसेच त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे. त्याच्या फिटनेस आणि आरोग्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आशिया चषकापर्यंत तो बरा असावा, अशी आमची इच्छा आहे, असेही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला. हेही वाचा - Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा चार वेगवान गोलंदाज - दरम्यान, आशिया चषकासाठी पाकिस्तानने शाहीन आफ्रिदीशिवाय आणखी चार वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. पाकिस्तान संघात हरिस रौफ व्यतिरिक्त शाहनवाज धाहानी, नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांच्या नावाचा समावेश आहे. तर बाबर आझमने कबूल केले की, आशिया चषक स्पर्धेतील आपला प्रवास भारतासारख्या संघाविरोधात सुरू होणार आहे आणि हा सामना त्याच्यासाठी खूप दबावाचा असणार आहे. मात्र, आपल्या संघाच्या वेगवान गोलंदाजीवर पूर्ण विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs Pakistan, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या