चेन्नई, 18 फेब्रुवारी : IPL Auction 2021 मध्ये सर्वांचे लक्ष भारतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर आहे. . अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची बेस प्राइज 20 लाख रुपये आहे. अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला नुकतेच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)च्या जर्सीमध्ये पाहण्यात आले होते, ज्यामुळे आयपीएल लिलावा पूर्वीच त्याची निवड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावरुन मुंबई इंडियन्स अर्जुनला विकत घेऊ इच्छित असल्याचं दिसत आहे.
अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) 14 फेब्रुवारी रोजी मुंबईत 73 व्या पोलीस आमंत्रण शील्ड क्रिकेट टूर्नामेंटच्या ग्रुपमधील सामन्यात 31 चेंडूत नाबाद 77 धावा काढल्या आणि 41 रन देऊन 3 विकेटही घेतले होते. स्पिन बॉलर हाशिर दाफेदार याच्या 1 ओव्हरमध्ये अर्जुनने पाच सिक्सर काढले. 21 वर्षीय अर्जुन (Arjun Tendulkar) याने आपल्या शानदार खेळीदरम्यान 5 चौकार आणि 8 षटकार लावले.
हे ही वाचा-IPL Auction 2021: CSK मॅनेजमेंटनं सांगितली मोठी बातमी, टीमच्या परंपरेला ब्रेक!
मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलं होतं डेब्यू
अर्जुन (Arjun Tendulkar) हा नुकताच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला होता. येथे त्याने मुंबईच्या सीनियर टीममध्ये पदार्पण केलं होतं. आज चेन्नईत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावादरम्यान त्याचे स्थान मजबूत आहे. अर्जुन लिलावापूर्वी नीता अंबानीच्या टीम मुंबई इडियन्सच्या जर्सीमध्ये पाहण्यात आले. अर्जुनने याचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अर्जुन मुंबई इंडियन्सच्या जर्सीत जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. अर्जुनच्या या फोटोनंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. आगामी आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्ससोबत खेळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आईपीएल 2021 (IPL 2021) च्या लिलावात एकूण 292 खेळाडूंची बोली लागणार आहे. आईपीएलचा (IPL) मागील सीजन कोरोना व्हायरसमुळे यूएई येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी हा सीजन भारतात होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने यापूर्वीच केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, Cricket, India, IPL 2021, Ipl 2021 auction, Mumbai Indians, Sports