मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /वयाच्या दहाव्या वर्षीच धोनीसोबत जाहिरात करणारी पूजा विश्वोई कोण आहे? वाचा सविस्तर

वयाच्या दहाव्या वर्षीच धोनीसोबत जाहिरात करणारी पूजा विश्वोई कोण आहे? वाचा सविस्तर

जोधपूरची पूजा विश्नोई (Pooja Vishnoi) ही 10 वर्षाची मुलगी सध्या महेंद्र सिंह धोनीसोबत (MS Dhoni) जाहिरात केल्यानं चांगलीच चर्चेत आहे. वयाच्या सातव्या वर्षी तिनं सिक्स पॅक अ‍ॅब्ज बनवून सर्व देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं.

जोधपूर, 2 सप्टेंबर : जोधपूरची पूजा विश्नोई (Pooja Vishnoi) ही 10 वर्षाची मुलगी सध्या चांगलीच चर्चेत आहे. वयाच्या सातव्या वर्षी तिनं सिक्स पॅक अ‍ॅब्ज बनवून सर्व देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तिनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) बरोबर जाहिरात शूट केली आहे.

पूजाचे मामा श्रवण हे अ‍ॅथलिट आहेत. त्यांनी पूजाला प्रेरणा दिली आणि एक अ‍ॅथलिट म्हणून तिला तयार केले. तिला क्रिकेट खेळायला देखील आवडते. फास्ट बॉलर असलेली पूजा विराट कोहली फाऊंडेशनची सर्वात कमी वयाची सदस्य आहे त्यामुळे या फाऊंडेशनच्या माध्यमातून तिचा खेळ आणि डायटवर लक्ष दिले जाते. पूजाची दर तीन महिन्याला ब्लड टेस्ट होते. या टेस्टच्या रिपोर्टनंतर तिचे डाएट निश्चित केले जाते.

काय आहे डाएट?

'भास्कर'नं दिलेल्या वृत्तानुसार पूजा रोज प्रॅक्टीसपूर्वी एक केळ, लिंबू सरबत, 15-20 खजूर आणि दोन अंजीर खाते. प्रॅक्टीसनंतर एक बाजरीची रोटी, एक वाटी भाजी, 10-12 बदाम, 5 ते 6 पिस्ते, 2 अक्रोड असा तिचा आहार आहे. त्याचबरोबर ती एक ग्लास दूध देखील पिते. पूजाचा दिवस पहाटे तीनपूर्वीच सुरू होतो. पहाटे तीन ते सकाळी सात पर्यंत रनिंग, त्यानंतर वर्क आऊट आणि ऑनलाईन शाळा. शाळेचा गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत ती पून्हा वर्क आऊट करते.

'दादा'बद्दल पुन्हा बोलले रवी शास्त्री! 'बसमधून उतरवलं होतं तेव्हा...'

ऑलिम्पिक गोल्ड जिंकण्याचं स्वप्न

2024 साली होणाऱ्या यूथ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं पूजाचं स्वप्न आहे. पूजानं 2019 साली झालेल्या इंडियन स्पोर्ट्स ऑनर स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये पुरस्कार पटकावला होता. पूजानं आजवर अनेक मोठ्य कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत. अर्थात हे सर्व करत असताना अनेक गोष्टी तिला सोडाव्या लागल्यात. गेल्या सात वर्षांपासून आपण आईसक्रीम खाल्लं नसल्याचं पूजानं सांगितलं आहे.

First published:

Tags: MS Dhoni