BCCI Election : भारतीय क्रिकेटमध्येही आता घराणेशाही, अमित शहांच्या मुलासह 'या' मंत्र्याचा भाऊ मैदानात

BCCI Election : भारतीय क्रिकेटमध्येही आता घराणेशाही, अमित शहांच्या मुलासह 'या' मंत्र्याचा भाऊ मैदानात

अमित शहा यांच्या मुलासह आता राज्यमंत्र्याचा भाऊ उतरला क्रिकेटच्या मैदानात.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) ही सर्वात क्रिकेट मोठी संस्था मानली जाते. भारतीय क्रिकेटमधील सर्व महत्त्वाचे निर्णय बीसीसीआयच्या वतीनं घेतले जातात. त्यामुळं बीसीसीआयची निवडणूक हा महत्त्वाचा विषय असतो. दरम्यान आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज दुपारी बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत घोषणा केली. त्याचबरोबर सचिव आणि कोषाध्यक्ष पदांसाठीही निवड करण्यात आली.

बीसीसीआयची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. याआधीच बीसीसीआयनं अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षांची नेमणुक केली. गांगुलीची अध्यक्षपदी निवड केल्यामुळे सगळीकडून बीसीसीआयचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे दोन राजकारणांच्या नातेवाईकांनाही प्रमुख पदे देण्यात आली आहेत. एकीकडे गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर अरुण धुमल यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये घराणेशाहीच्या चर्चा रंगल्या आहेत.

वाचा-सौरव गांगुलीची BCCIच्या अध्यक्षपदी निवड, अमित शहांच्या मुलाची सचिवपदी नियुक्ती

अमित शहा यांच्या मुलाची याआधी गुजराज क्रिकेट असोसिएशच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यासाठीही कोणतीही निवडणूक घेण्यात आली नव्हती. दरम्यान याबाबत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी, “जेव्हा माझे बाबा गृहमंत्री होते तेव्हा जर मला बीसीसीआयचे सचिवपद दिले असते तर भक्त काय म्हणाले असते?”, असे ट्वीट केले आहे. त्यामुळं सोशल मिडीयावर जय शाहांची सचिवपदी निवड झाल्यामुळं काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी, “क्रिकेटला आधीपासूनच राजकारणाची जोड आहे. शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्याआधी लालुप्रसाद यादव, राजीव शुक्ला यांच्यापासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी क्रिकेट असोसिएशनचे काम केले आहे. त्यामुळं जय शहाला टार्गेट केले जाऊ नये”, असे मत व्यक्त केले आहे.

कोण आहेत जय शहा?

जय शाह गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा असून त्यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी याआधी निवड करण्यात आली होती. दरम्यान अमित शहा अध्यक्ष असताना जय शहा गुजरात क्रिकेटचे सहसचिव होते. त्यानंतर अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीशिवाय त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता जय शहा यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

वाचा-कसोटी रॅकिंगमध्ये विराटचा दबदबा, स्मिथला धोबीपछाड देत पुन्हा होणार किंग?

कोण आहेत अरुण सिंह धुमल?

अरुण धुमल हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत. याआधी गेल्याच महिन्यात धुमल यांची हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळं तब्बल 10 वर्षांनंतर हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद बदलले. मात्र एकाच घरात गेल्यानं हा वादाचा विषय झाला होता. मात्र आता अरुण सिंह धुमल यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

10 महिन्यासांठी झाली निवड

मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो. त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. याचबरोबर जय शहा आणि अरुण सिह धुमल यांचीही 10 महिन्यांसाठी निवड झाली आहे.

वाचा-आता दरवर्षी होणार टी-20चा थरार, क्रिकेट चाहत्यांसाठी ICCने घेतला मोठा निर्णय

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

Published by: Priyanka Gawde
First published: October 14, 2019, 6:13 PM IST

ताज्या बातम्या