मुंबई, 6 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहे . या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 9 मार्च पासून या सामन्यांना सुरुवात होत असून हा सामना दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. अशातच आता या सामन्याला भारतासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी मालिकेत भारताने आतापर्यंत नागपूर आणि दिल्ली येथील कसोटी सामना जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली इंदोर येथील तिसरा कसोटी सामना जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाठली आहे.
अखेर शुभमनने केला प्रेमाचा खुलासा! या अभिनेत्रीच नाव घेतल्याने सर्वांनाच बसला धक्का
अहमदाबाद येथील कसोटी सामना जिंकणं भारतासाठी अतिशय महत्वाच आहे. हा सामना भारताने जिंकला तरच त्यांना ऑस्ट्रेलिया सोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाठता येईल. तसे झाले नाही तर त्यांना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. भारतासाठी इतक्या महत्वाच्या सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तर त्यांच्या सोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील उपस्थित राहतील.
PM Narendra Modi and Australian PM Anthony Albanese to watch day 1 of the final test match of the Border-Gavaskar Trophy in Ahmedabad.
(File photo) pic.twitter.com/xX1ztb5QV5 — ANI (@ANI) March 6, 2023
ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरेल यांनी सांगितले की , "क्रिकेट ही दोन देशांना जोडणारी एक गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये सामन्याच्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सामना बघताना पाहणे खूप आनंददायी ठरेल".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Narendra Modi, PM Modi, Team india