'धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, तर..', BCCI वर भडकली बॉलिवूड अभिनेत्री

'धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, तर..', BCCI वर भडकली बॉलिवूड अभिनेत्री

भारता बांगलादेश टी20 सामना दिल्लीतच खेळवण्याचा निर्णय बीसीसीआय़ने घेतला आहे. त्यावरून बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा भडकली.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाच्या टी20 मालिकेतील सुरुवातीचे सामने दिल्लीत खेळायचे आहेत. पण दिल्लीतील सध्याचे दूषित वातावरण चिंतेचा विषय झाले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे की, दिल्लीत होणाऱ्या टी20 सामन्याचे ठिकाण बदलणार नाही. यावर बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा भडकली.

भारत आणि बांगलादेश दोन्ही टीम दिल्लीमध्ये होणाऱ्या टी20 सामन्याचा सराव करत आहे. प्रदुषणाचा त्रास असतानाही दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळाडूंचा सराव सुरू आहे. खेळाडू तोंडाला मास्क लावून मैदानात उतरले होते.

दिया मिर्झाने दिल्लीत सामना खेळवण्याच्या बीसीसीयआच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तिने ट्विटरवरून बीसीसीआयला सुनावले आणि या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

बीसीसीआयने टी20 सामना खेळवण्याचा घेतलेला निर्णय हैराण करणारा आहे. दिल्लीतील AQI 412 इतकी आहे. धोक्याची माहीती असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून आपणच त्यावर उपाय शोधत नसल्याचं दिया मिर्झाने म्हटलं आहे.

बांगलादेशच्या संघानेही सामना खेळण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांचे म्हणणे होते की, सामना फक्त तीन तासाचा होईल आणि यात खेळाडूंना थोडा त्रास होईल पण लगेच जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. असं प्रदुषण जगातील अनेक देशांमध्ये बघायला मिळतं. बांगलादेशातसुद्धा अशीच परिस्थिती आहे.

पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

First published: November 2, 2019, 11:10 AM IST
Tags: BCCI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading