दुबई, 10 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अतिशय निराशजनक ठरली. टीम इंडियाच्या (Team India) खराब कामगिरीचे खापर क्रिकेट जगतात सर्वांनी यंदा खेळवण्यात आलेल्या आयपीएलवर (IPL2021) फोडले. मात्र, किवींचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) आयपीएल आमच्यासाठी फायद्याची ठरली असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी, विल्यमसनने हे वक्तव्य केले आहे.
टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा दोष बहुतांश क्रिकेट तज्ज्ञांनी यंदा खेळवण्यात आलेल्या आयपीएलला दिला. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर #BANIPL मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.
भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाहीत आणि थकलेले दिसत आहेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. अशातच, केन विल्यमसनने आयपीएल फायद्याची ठरली असल्याचे म्हटले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) यांच्यात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेतील पहिली सेमी फायनल होणार आहे. तत्पूर्वी, किवींचा कर्णधार केन विल्यमसनने सर्वांनी यंदा खेळवण्यात आलेल्या आयपीएलसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
विल्यमसन म्हणाला, "आयपीएल आणि फ्रँचायझी संघांच्या शिबिरांमुळे सर्व देशांच्या खेळाडूंना येथील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत झाली. तसेच, नशिबानेही त्याच्या संघाला साथ दिली. “कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो हे आम्हाला माहीत होते आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत ते पाहिले आहे. काही संघांनी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात केली. पण सामन्याच्या दिवशीही नशिबाने आम्हाला साथ दिली असल्याचे त्याने यावेळी म्हटले आहे.
आम्ही स्वतःला नशिबवान समजतो आम्ही त्या टप्प्यावरून पुढे जाऊ शकलो आणि आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आणि आम्हाला आमची विजयाची लय तशीच सुरु ठेवायची आहे.
यासोबतच विल्यमसनने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी या जोडीचे कौतुक केले. ज्यांनी न्यूझीलंडच्या यशात अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एक भूमिका. “त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. तो बऱ्याच काळापासून सर्व फॉरमॅटमध्ये योगदान देत आहे आणि त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे.
दोन वर्षांपूर्वी 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध पराभव न होताही न्यूझीलंडला वर्ल्ड कप विजेतेपद मिळाले नव्हते. दोन्ही देशांमधील फायनल मॅच सुपर ओव्हरमध्येही टाय झाली होती. त्यानंतर इंग्लंडच्या टीमला बाऊंड्रीच्या आधारे विजेता घोषित करण्यात आले. आता सेमी फायनलमध्ये या जखमेवर मलम लावण्याची संधी केन विल्यमसनच्या (Kane Williamson) टीमकडे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india