मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Legends Cricket: 2011 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचं होणार रीयुनियन, रिटायर्ड रैनाही लीजंड्स संघात सामील

Legends Cricket: 2011 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचं होणार रीयुनियन, रिटायर्ड रैनाही लीजंड्स संघात सामील

इंडिया लीजंड्स संघ 2021

इंडिया लीजंड्स संघ 2021

Legends Cricket: रोड सेफ्टी वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले दिग्गज खेळाडू निवृत्तीनंतर पुन्हा एकत्र येणार आहेत. या संघात सुरेश रैनाचीही वर्णी लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 6 सप्टेंबर: सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट गाजवणारे दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. निमित्त आहे ते भारतात होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचं. या ट्वेन्टी ट्वेन्टी लीग स्पर्धेत आठ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारतासह, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. 10 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

विश्वविजेत्या संघातले 5 खेळाडू

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. दिग्गजांच्या या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व सचिन तेंडुलकरकडे सोपवण्यात आलं आहे. या संघात 2011 च्या विश्वविजेत्या संघातील 5 खेळाडूंचा समावेश आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिनसह, युवराज सिंग, मुनाफ पटेल, युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दिग्गज खेळणार आहेत.

निवृत्तीनंतर रैना लीजंड्स संघात

दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारताच्या सुरेश रैनानं निवृत्ती घोषित केली. पण निवृत्तीनंतर अवघ्या काही तासातच रैना लीजंड्सच्या संघात सामील झाला. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या आयोजकांनी याबाबत अधिकृत घोषणाही केली आहे. त्यामुळे रैना आता लीजंड्स क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान 10 सप्टेंबरपासून लीजंड्स क्रिकेटमधील साखळी सामन्यांना सुरुवात होईल. भारतातल्या चार शहरांमध्ये या आठ संघात 23 सामने खेळवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल.

First published:

Tags: Sachin tendulkar, Sports, T20 cricket