Home /News /sport /

PKL Auction : प्रदीप नरवालवर विक्रमी बोली, किंमत ऐकून बसेल शॉक!

PKL Auction : प्रदीप नरवालवर विक्रमी बोली, किंमत ऐकून बसेल शॉक!

प्रदीप नरवालने इतिहास घडवला

प्रदीप नरवालने इतिहास घडवला

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात (Pro Kabaddi League Auction) इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लागली आहे. प्रदीप नरवाल (Pradeep Narwal) याला यूपी योद्धासनी (UP Yoddha) तब्बल 1.60 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे

    मुंबई, 30 ऑगस्ट : प्रो कबड्डी लीगच्या लिलावात (Pro Kabaddi League Auction) इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लागली आहे. प्रदीप नरवाल (Pradeep Narwal) याला यूपी योद्धासनी (UP Yoddha) तब्बल 1.60 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. प्रदीप नरवाल याची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. पण सुरुवातीलाच तेलुगू टायटन्सने त्याच्यावर 1.20 रुपयांची बोली लावली, पण यूपी योद्धासनी प्रदीपला विकत घेण्यासाठी तिजोरी उघडली आणि विक्रमी पैसे खर्च केले. प्रो कबड्डी लीगच्या लिलावाआधी पटना पायरेट्सने प्रदीप नरवालला रिलीज केलं होतं, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण प्रदीप नरवाल प्रो कबड्डी लीगमधल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. लीगच्या इतिहासातला प्रदीप हा सर्वाधिक रेड पॉईंट्स स्कोअर करणारा खेळाडू आहे. पीकेएलच्या सातव्या मोसमात 900 पॉईंट्स करणारा प्रदीप हा पहिलाच खेळाडू होता. पटना पायरट्सने 2016-17 मध्ये लागोपाठ तीन टायटल्स जिंकली, यावेळी प्रदीप पटनाच्या टीमचा अविभाज्य भाग होता. प्रदीपने प्रो कब्बडी लीगमध्ये सर्वाधिक 1160 रेड पॉईंट्स मिळवले आहेत, जो एक विक्रम आहे. 6 मोसमांच्या 106 मॅचमध्ये 10.84 च्या सरासरीने प्रदीप खेळला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या