Home /News /sport /

PKL Auction : कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर पैशांचा पाऊस, सिद्धार्थ देसाई पुन्हा झाला करोडपती!

PKL Auction : कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर पैशांचा पाऊस, सिद्धार्थ देसाई पुन्हा झाला करोडपती!

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सिद्धार्थ झाला मालामाल

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सिद्धार्थ झाला मालामाल

प्रो कबड्डी लीगच्या लिलावामध्ये (Pro Kabaddi League Auction) कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईवर (Siddharth Desai) पैशांचा पाऊस पडला आहे.

    मुंबई, 30 ऑगस्ट : प्रो कबड्डी लीगच्या लिलावामध्ये (Pro Kabaddi League Auction) कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईवर (Siddharth Desai) पैशांचा पाऊस पडला आहे. सिद्धार्थवर 1 कोटी 30 लाख रुपयांची बोली लावून तेलुगू टायटन्सने (Telugu Titans) रिटेन केलं. सिद्धार्थला रिटेन करण्यासाठी टायटन्सला एफबीएम कार्डचा वापर करावा लागला. सिद्धार्थ देसाईची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. मागच्या लिलावाच्या तुलनेत सिद्धार्थ देसाईला कमी रक्कम मिळाली. 2019 च्या लिलावात तेलुगू टायटन्सने त्याला 1.45 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2018 च्या मोसमात सिद्धार्थला यू मुंबाने फक्त 36.4 लाख रुपयांना खरेदी केली होतं. या मोसमात त्याने धमाकेदार कामगिरी केल्यामुळे पुढच्या लिलावात त्याच्यावर कोट्यवधींची बोली लागली. सिद्धार्थ देसाई कोल्हापूरच्या चंदगडचा रहिवासी आहे. प्रो कबड्डी लीग सुरू व्हायच्या आधीही सिद्धार्थचा संपूर्ण फोकस हा खेळावरच होता. 'मी सुरुवातीला कबड्डी खेळायचो, पण व्यावसायिक नाही. मातीच्या कोर्टात मी स्थानिक स्पर्धा खेळल्या. जेव्हा प्रो कबड्डी लीग सुरू झाली तेव्हा मी खेळाला गांभिर्याने घ्यायला लागलो. प्रशिक्षण घेण्यासाठी मी पुण्याच्या क्लबमध्ये गेलो,' असं सिद्धार्थ देसाईने सांगितलं. आधीपासूनच फिटनेसला महत्त्व देत असल्यामुळे कबड्डी खेळताना त्याला याचा फायदा झाला. 'मी दहावीत असल्यापासूनच फिटनेससाठी वेडा होतो. मला चांगलं आणि फिट दिसायचं होतं. मी फिटनेस खेळासाठी करत नव्हतो. मी जिममध्ये खूप वर्क आऊट आणि ट्रेनिंग करायचो,' अशी प्रतिक्रिया सिद्धार्थने दिली. सिद्धार्थचे वडील आणि मोठा भाऊ देखील कबड्डी खेळायचे, त्यामुळे सिद्धार्थनेही कबड्डी खेळायला सुरुवात केली. अभ्यासासोबतच तो लोकल क्लब आणि स्पर्धांमध्ये कबड्डी खेळायचा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने व्यावसायिक कबड्डी खेळण्याचा निर्णय घेतला. 2018 साली त्याची महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली. यादरम्यान त्याने सीनियर नॅशनल ट्रॉफीचा किताब पटकावला. यानंतर लगेचच प्रो कबड्डी लीगच्या लिलावात तो सहभागी झाला. पहिल्याच मोसमात यू मुंबाने त्याला 36.4 लाखांमध्ये विकत घेतलं. ही रक्कम त्याच्या बेस प्राईजच्या 5 पट जास्त होती. प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सिझनच्या सुरुवातीच्या काही मॅचमध्येच सिद्धार्थने आपला करिश्मा दाखवला. आता सिद्धार्थ नव्या सिझनमध्ये पुन्हा एकदा तेलुगू टायटन्सकडून खेळताना दिसेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pro kabaddi league

    पुढील बातम्या