Elec-widget

स्मृती मानधनाच्या फोटोला लावली लिपस्टिक आणि काजळ, चाहते भडकले

स्मृती मानधनाच्या फोटोला लावली लिपस्टिक आणि काजळ, चाहते भडकले

फोटोशॉप करून फोटोत काहीही बदल केले जातात. भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी राग काढला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या एका फोटोला फोटोशॉप केल्यानं सध्या सोशल मीडियावर चाहते राग व्यक्त करत आहे. भारतीय संघाची स्टार फलंदाज असलेल्या स्मृती मानधनाचे फोटो गुगलवर सर्च करताच त्यामध्ये लिपस्टिक आणि काजळ लावलेले फोटो दिसत आहेत. फक्त एवढ्यावरच फोटोशॉप थांबलेलं नाही तर मानधनाचा चेहरा गोरा करण्याचाही प्रयत्न केला आहे.

एका युजरने स्मृतीचा फोटोशॉप केलेला फोटो शेअर करत राग व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलत असलेला हा फोटो असून तिच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. यामध्ये फोटोशॉपचा वापर करून तिचा चेहरा गोरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याशिवाय काजळ आणि लिपस्टिकही लावली आहे. सौंदर्याची ही कोणती व्याख्या असंही युजरने म्हटलं आहे.

फोटोशी छेडछाड केल्यानंतर भडकलेल्या चाहत्यांनी म्हटलं की, स्मृती आधीच सुंदर आहे तिला असं फोटोशॉपने सुंदर करण्याची गरज नाही.

अनेक वेबसाइटवर स्मृतीचा हा फोटो आहे. वुमन्स क्रिकेटर बायोग्राफी या संकेतस्थळावरही हाच फोटो आहे. याचा स्क्रिनशॉट युजरने शेअर केला आहे.

Loading...

स्मृती मानधना ही गेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ठ महिला क्रिकेटपटू ठरली होती. दुखापतीनंतर तिने विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केलं आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2 हजार धावांचा टप्पा ओलांडला. भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीलासुद्धा तिने याबाबतीत मागे टाकलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...