लेह विमानतळावर धोनीच्या तपासणीचे फोटो व्हायरल, पाहा काय झालं

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी गेल्या 15 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षण पूर्ण करून धोनी दिल्लीत परतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 07:21 AM IST

लेह विमानतळावर धोनीच्या तपासणीचे फोटो व्हायरल, पाहा काय झालं

विंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं टेरिटोरियल आर्मीमध्ये प्रशिक्षण घेतलं. 15 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर धोनी दिल्लीला परतला. धोनी 30 जुलैपासून लेहमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत होता.

धोनी जेव्हा दिल्लीत पोहचला तेव्हा मुलगी झिवा त्याला भेटताच भावूक झाली. धोनीच्या चाहत्यांनी त्याचा हा फोटो शेअर केला आहे. लेह विमानतळावरून निघताना त्याची सर्वसामान्य प्रवाशासारखी तपासणी करण्यात आली.

लष्करात काश्मीर खोऱ्यात धोनीनं प्रशिक्षत्ण घेतलं. स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला धोनी नवा केंद्रशासित प्रदेश लडाखला गेला होता. त्याठिकाणी आर्मी हॉस्पिटलमध्ये धोनीने रुग्णांची भेट घेतली.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, धोनीने आपण विंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लष्करासोबत काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतलं.

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011मध्ये धोनीला लेफ्टननं कर्नल हे मानद देण्यात आले होते. त्याचबरोबर धोनी क्वालिफाईड पॅराट्रूपरही आहे. याअंतर्गत धोनीने 2015 मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 18, 2019 07:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...