IPL 2019 : बंगळुरू विरुद्ध राजस्थानच्या सामन्याला 'फानी' वादळाचा फटका

राजस्थाननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळं राजस्थानला याचा फटका बसू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 08:21 PM IST

IPL 2019 : बंगळुरू विरुद्ध राजस्थानच्या सामन्याला 'फानी' वादळाचा फटका

बंगळुरू, 30 एप्रिल : बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या सामन्याला फानी वादळाचा फटका बसला आहे. पावसामुळं या दोन्ही संघातील होणारा सामना काही काळ उशीरानं सुरु होण्याची शक्यता आहे.बंगळुरू आणि राजस्थान हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला असले तरी, राजस्थानला आजच्या सामन्यात शेवटची संधी असणार आहे. दरम्यान, या सामन्यात राजस्थाननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळं राजस्थानला याचा फटका बसू शकतो.


Loading...


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, फानी चक्रीवादळ येत्या दोन दिवसात रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. हे वादळ 4 मे रोजी ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकतं. मात्र, आज बंगालच्या उपसागरात हे वादळ पोहचले असल्यामुळं बंगळुरूला याचा फटका बसला.

दरम्यान आयपीएलच्या प्रत्येक हंगामात बंगळुरू संघाला आपल्या घरच्या मैदानावर पावसामुळं त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता हा सामना पुन्हा कधी सुरु होणार याबाबत माहिती मिळालेली नाही. दुसरीकडं कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ऐवजी स्टीव्ह स्मिथला नेतृत्व दिल्यानंतर राजस्थाननं सलग सामने जिंकले. मात्र, आज यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळणारा स्मिथ राजस्थानला आणखी एक विजय मिळवून देणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत स्मिथकडे राजस्थानचे नेतृत्व सोपवण्यात आले. तेव्हापासून चारपैकी तीन सामने जिंकून राजस्थानने बाद फेरीच्या शर्यतीत स्वत:चे आव्हान कायम राखले आहे.

blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

It's the @RCBTweets vs the @rajasthanroyals tonight at the Chinnaswamy.#RCBvRR pic.twitter.com/uobXqNZA8P

— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2019


दुसरीकडे रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे विराट कोहलीच्या बेंगळूरुला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. 12 सामन्यांतून चार विजय आणि आठ पराभवांसह गुणतालिकेच्या तळाशी असणाऱ्या बेंगळूरुला आता प्रतिष्ठेसाठी खेळावे लागणार आहे.


VIDEO : या अपघातामुळं भारताला मिळाला रो'हिट' !बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...