मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: विराटच्या खराब फॉर्ममुळे अनुष्का शर्मा टार्गेट, ट्रोलर्सनी केली हद्द पार

IPL 2022: विराटच्या खराब फॉर्ममुळे अनुष्का शर्मा टार्गेट, ट्रोलर्सनी केली हद्द पार

virat kohli

virat kohli

आयपीएल (IPL 2022) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा होती. परंतु तसे होताना दिसत नाहीये.

मुंबई, 24 एप्रिल: आयपीएल (IPL 2022)  फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा होती. परंतु तसे होताना दिसत नाहीये. आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 36 वा सामना आरसीबी विरुद्ध एसआरएच (RCB vs SRH) यांच्यात खेळवण्यात आली. या सामन्यात विराट कोहली पुन्हा गोल्डन डक वर आऊट झाला. त्याच्या या कामगिरीनंतर सध्या तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. पण या सर्वात त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील ट्रोल होतीय.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) विराट लागोपाठ दुसऱ्यांदा गोल्डन डकवर (Golden Duck) म्हणजेच पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH vs RCB) सामन्यात मार्को जेनसनने विराटला पहिल्याच बॉलला आऊट केलं, याआधी लखनऊविरुद्ध दुष्मंता चमिरानेही पहिल्याच बॉलला विराटला माघारी पाठवलं.

बाद झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या या खराब फार्ममुळे पत्नि अनुष्काही ट्रोल होतिय.

अनुष्काबद्दल आतापर्यंत लोकांनी ट्विटरवर हजारो ट्विट केले आहेत. अनेकांनी मर्यादा ओलांडली आणि विराटच्या खराब फॉर्मसाठी अनुष्काला दोष देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अनुष्काच्या समर्थनार्थ अनेक चाहते समोर आले. विराटच्या खराब कामगिरीमुळे अनुष्काला यापूर्वी अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.

अनुष्का जेव्हा स्टिडिअममध्ये येते तेव्हा तो खराब खेळतो असे अनेकांनी मत नोंदवले आहे. तर काही नेटकऱ्यांनी ''2017 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि विराट कोहलीची पुढील 2 वर्षांची कारकीर्द सर्वोच्च होती. तेव्हा कोणीही अनुष्काचे अभिनंदन केले नाही. मग आता टार्गेट का करत आहात? प्रत्येक खेळाडूला चढ-उतार होत असतात. त्यांच्या कुटुंबाला दोष देणे थांबवा. अशा आशयाची पोस्ट करत त्या दोघांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

यंदाच्या मोसमात विराट 5 वेळा 10 चेंडूंचा सामना करण्याआधीच बाद झाला आहे. हे आयपीएल 2008 नंतर त्याचे सर्वात खराब प्रदर्शन आहे. चालू हंगामातील 8 डावांमध्ये त्याने 17 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 13 होता आणि त्याच्या बॅटमधून 9 चौकार, तर 2 षटकार निघाले आहेत. असे असले, तरी विराट आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने एका आयपीएल हंगामात 900 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या, जे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Ipl 2022, RCB, Virat kohli