पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ, जाणून घ्या कारण

पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ, जाणून घ्या कारण

पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) त्यांच ऑफिसच बंद करायची वेळ आली आहे. बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus) आल्यामुळे सोमवारी लाहोरमधलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय बंद करण्यात आलं.

  • Share this:

लाहोर, 9 मार्च : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) त्यांच ऑफिसच बंद करायची वेळ आली आहे. बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus) आल्यामुळे सोमवारी लाहोरमधलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय बंद करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी सहा क्रिकेटपटू आणि एका सहकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगही (PSL) स्थगित करण्यात आली, यानंतर आता बोर्डाच्या आणखी एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

पीएसएल स्थगित झाल्यानंतर टीमसाठी हॉटेलमध्ये आणि स्टेडियममध्ये बायो-बबलचे नियम लागू करण्यावरून पीसीबीवर टीका करण्यात आली. पीसीबीच्या चिकित्सा पॅनलचे प्रमुख डॉक्टर सोहेल सलीम यांनी याप्रकरणी अध्यक्ष एहसान मणी यांच्याकडे राजीनामा सोपावला. तर दुसरीकडे याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सदस्यीय मेडिकल पॅनलची स्थापना केली आहे. बायो-बबलमध्येही खेळाडूंना कोरोना कसा झाला, याची चौकशी हे पॅनल करणार आहे.

मेडिकल पॅनलमध्ये डॉक्टर सय्यद फैजल महमूद आणि डॉक्टर सलमाम मोहम्मद यांचा समावेश आहे. हे दोन्ही डॉक्टर पीएसएलमधल्या बायो-बबल प्रोटोकॉलची समिक्षा करतील. 31 मार्चपर्यंत हे पॅनल पीसीबीकडे त्यांचा रिपोर्ट सोपवेल.

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 30 खेळाडूंना पाठवण्याची योजना बनवत आहे. व्यावसायिक विमानांऐवजी खेळाडूंना चार्टर्ड विमानांनी पाठवण्याचा बोर्डाचा प्रयत्न असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. पीएसएल स्थगित झाल्यानंतर आता आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. मागच्या वर्षी न्यूझीलंडला व्यायसायिक विमानाने खेळाडूंना पाठवण्यात आलं होतं, त्यानंतर 8-10 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाला, त्यामुळे पुढचे 14 दिवस खेळाडूंना क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि चार टी-20 तर झिम्बाब्वेमध्ये दोन टेस्ट आणि तीन टी-20 खेळणार आहे.

Published by: Shreyas
First published: March 9, 2021, 12:10 PM IST

ताज्या बातम्या