Home /News /sport /

'फक्त 1 कप चहा, एसी-लाईट बंद', कंगाल PCB चा धडकी भरवणारा नियम!

'फक्त 1 कप चहा, एसी-लाईट बंद', कंगाल PCB चा धडकी भरवणारा नियम!

न्यूझीलंड क्रिकेट टीमने सामना सुरू व्हायच्या काही मिनिटं आधी दौऱ्यातून माघार घेतली, मग इंग्लंडनेही दौरा रद्द केला, त्यामुळे आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) परिस्थिती आणखी बिकट झाली.

    लाहोर, 3 ऑक्टोबर : न्यूझीलंड क्रिकेट टीमने सामना सुरू व्हायच्या काही मिनिटं आधी दौऱ्यातून माघार घेतली, मग इंग्लंडनेही दौरा रद्द केला, त्यामुळे आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) परिस्थिती आणखी बिकट झाली. यातून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी कठोर पावलं उचलली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विकासासाठी रमीझ राजा यांनी बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खर्च कमी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जास्त पगार मिळत आहे, त्यांना रमीझ राजा यांनी अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे. T20 World Cup : पाकिस्तानला मिळणार नवा कोच, 'या' दिग्गज खेळाडूचं नाव आघाडीवर द न्यूजमध्ये आलेल्या वृत्तानुसार रमीझ राजा यांनी लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये पीसीबीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यंसोबत बैठक घेतली. 'आपल्या सगळ्यांना परिस्थिती नीट करण्यासाठी काम करावं लागेल. टीम एक नंबरला पोहोचत नसेल, तर आपल्या इकडे राहण्याला काहीही अर्थ नाही. खर्च कमी करण्यासाठी आपण पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून शिकलो आहे,' असं राजा म्हणाले. T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली 'आपल्याला खर्च कमी करावे लागतील. दोन ऐवजी एकच कप चहा प्या. एसीचा वापर कमी करा आणि जेव्हा ऑफिसमधून बाहेर जाल तेव्हा लाईट बंद करा. टीम एक नंबरला जात नसेल, तर आपल्या इकडे असण्याला काही अर्थ नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल,' असं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं. T20 World Cup : भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पंतप्रधान नाराज, लवकरच टीममध्ये बदल होणार!
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या