Paytmने लावली रेकॉर्डब्रेक बोली, भारतीय क्रिकेटमध्ये मिळाला सर्वात मोठा अधिकार!

Paytmने लावली रेकॉर्डब्रेक बोली, भारतीय क्रिकेटमध्ये मिळाला सर्वात मोठा अधिकार!

पेटीएमनं (Paytm) पुन्हा एकदा बीसीसीआयच्या Title Sponsor चे हक्क मिळवले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : पेटीएमनं (Paytm) पुन्हा एकदा बीसीसीआयच्या Title Sponsor चे हक्क मिळवले आहेत. पुढच्या 4 वर्षांसाठी पेटीएमकडे बीसीसीआयची स्पॉन्सरशीप असणार आहे. यासाठी Paytm कंपनीने बीसीसीआयला तब्बल 326.80 कोटी रुपये मोजले आहेत. बीसीसीआयनं आपल्या ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केली आहे.

पेटीएमची मालकी हक्क असलेल्या वन-97 कम्युनिकेशन प्राईव्हेट लिमिटेड (One97 communication private limited)ने बुधवारी हे अधिकार मिळवले. त्यासाठी त्यांनी प्रत्येक सामन्याकरिता तब्बल 3.80 कोटी रुपये मोजले आहेत. याआधी 2015मध्ये चार वर्षांसाठी या कंपनीला हे अधिकार मिळाले होते.

बीसीसीआयनं, “326.80 कोटींची बोली 2019-23 या कालावधीसाठी लावण्यात आली होती. त्यात विजयी बोली ही 3.80 कोटी प्रत्येक सामन्यासाठी ठरली”, अशी माहिती दिली.

काय आहे Title Sponsorship

टायटल स्पॉन्सरशिप मिळालेल्या कंपनीला सर्व मालिकांमध्ये त्यांचे नाव पहिले येते. या संदर्भातील सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत. भारत-साऊथ आफ्रिका यांच्यात होणाऱ्या फ्रिडम सिरीजही आता पेटीएम मालिका या नावानं ओळखली जाणार आहे. त्याचप्रमाणे भारतात होणाऱ्या सर्व मालिका या पेटीएमच्या नावावर असणार आहे.

वाचा-फॉरेनचा जावई! हसन अलीनंतर 'हा' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करणार भारतीय मुलीशी लग्न

पेटीएमनं टाकले ड्रीम11ला मागे

इएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार, टायटाल स्पॉन्सरच्या शर्यतीत तीन कंपनी आघाडीवर होत्या. यात पेटीएमनं ड्रीम 11 या कंपनीला मागे टाकले आहे. बीसीसीआयच्या वतीनं 2.5 कोटींची बेस प्राईज ठेवण्यात आली होती. यात पेटीएमच्या वतीनं 3.80 कोटींची बोली लावण्यात आली होती. 2015मध्ये बीसीसीआयनं 1.70 कोटींची बेस प्राईज ठेवली होती, त्यावेळी पेटीएमनं 2.42 कोटींची बोली लावली होती.

वाचा-धोनीच्या ‘त्या’ एका निर्णयावर भडकला सेहवाग, म्हणाला...

भारतीय क्रिकेटशी जोडल्याचा आनंद जास्त-वर्मा

पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर वर्मा यांनी, “बीसीसीआय णि भारतीय क्रिकेट संघ यांच्याशी जोडल्याचा आनंद वेगळा आहे. आम्हच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत व्यक्त केले होते.

वाचा-अखेर भांडण मिटलं! विराटनं शेअर केला पण नेटकऱ्यांनी रोहितला केलं ट्रोल

VIDEO : कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे झाले भावूक, केलं हे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading