कॉमनवेल्थमध्ये सुवर्णवेध घेतल्यानंतर आता 'लक्ष्य' आईला खासदार करण्याचं

कॉमनवेल्थमध्ये श्रेयसी सिंहने भारताला नेमबाजीत सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

  • Share this:

देशभरात लोकसभेच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. यात स्टार प्रचारकही आपआपल्या पक्षाचा, नेत्यांचा प्रचार करत आहेत. सध्या चर्चा सुरू आहे ती देशातील टॉपची महिला शूटर श्रेयसीची. बिहारच्या बांका येथील असलेल्या श्रेयसिने ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉनमवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.

कॉमनवेल्थमध्ये सुवर्णवेध घेतलेली श्रेयसी सिंह आता प्रचारासाठी गावोगावी जावून मतदारांना मत देण्याचं आवाहन करत आहे. श्रेयसी स्वत:साठी नाही तर तिच्या आईसाठी मत मागत आहे. श्रेयसीची आई पुतुल देवी या बांका मतदारसंघाच्या माजी खासदार आहेत. गेल्या निव़डणुकीत जय प्रकाश यादव यांनी त्यांचा पराभव केला होता.

2019 च्या निवडणुकीत एनडीएकडून तिकिट मिळेल अशी आशा पुतुल देवी यांना होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने पुतुल देवी यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

पुतुल देवी या माजी केंद्रीय मंत्री, स्वर्गीय दिग्विजय सिंह यांच्या पत्नी आहेत. दिग्विजिय सिंह तीन वेळा बांका मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. त्यांनाही 2009 मध्ये जदयुने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवड़णूक लढले होते.

दिग्विजय सिंह यांचे भाजपमध्ये राजकीय वजन होते. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आणि रेल्वे मंत्री म्हणूनही काम केलं होतं.

दिग्विजय सिंह भाजपमध्ये राजकीय वजन होते. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आणि रेल्वे मंत्री म्हणूनही काम केलं होतं.

श्रेयसी तिच्या आईच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत आहे. ती भागातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहे. राजकारणाचं बाळकडू वारसा हक्कानं श्रेयसीला मिळालं आहे. 2014 मध्ये पुतुल यांच्या प्रचारासाठी लाल कृष्ण आडवाणी आले होते.

आई आणि वडील दोघेही राजकारणात असताना श्रेयसीने मात्र खेळाची वाट निवडली. तिने नेमबाजीत आपले करिअर सुरू केलं आणि भारतासाठी सुवर्णपदकही पटकावलं.

जदयु यावेळी श्रेयसीला तिकिट देण्याच्या तयारीत होती. मात्र पुतुल देवींना स्वत: लढायचे असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. जदयुने या ठिकाणी गिरधारी यादव यांना तिकिट दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...