11 एप्रिल : यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्णमय सफर अगदी जोरदार सुरू आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. यात विशेष म्हणजे यंदाही हे पदक महिलेनंच पटकावलंय. डबल ट्रॅप शूटिंग स्पर्धेत श्रेयसी सिंगनं उत्तुंग कामगिरी करत देशासाठी सुवर्ण पदक जिंकलं आहे.
तिच्या या यशामुळे भारताच्या खात्यात आता एकूण 23 पदकं झाली आहेत. यामध्ये 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे.
श्रेयसीचा स्पर्धात्मक प्रवास
- श्रेयसीनं 2014च्या ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं. -
- 2010च्या दिल्ली राष्ट्रकूल स्पर्धेतही तिनं भाग घेतला होता.
- पेअर ट्रॅप स्पर्धेत तिनं 5वा क्रमांक पटकावला होता.
- तिचे आजोबा आणि वडीलही रायफल शूटिंगमध्ये निष्णात आहेत.
श्रेयसी सिंह को #GC2018 के Women's Double Trap निशानेबाज़ी स्पर्धा में स्वर्ण पदक जीतने के लिए बधाई; देश को आप पर गर्व है – राष्ट्रपति कोविन्द #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) April 11, 2018
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा