आत्मविश्वासनं फलंदाजाचा केला घात, पाहा क्रिकेटमधल्या अजब रनआऊटचा VIDEO

आत्मविश्वासनं फलंदाजाचा केला घात, पाहा क्रिकेटमधल्या अजब रनआऊटचा VIDEO

अतिआत्मविश्वास नडला, रनआऊट होत फलंदाजानं करून घेतलं हसं.

  • Share this:

रांची, 1 नोव्हेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शहरात सुरू असलेल्या देवधर ट्रॉफीमध्ये (Deodhar Trophy) पहिला सामना खेळला गेला. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंडिया बी आणि ए यांच्यात अजब प्रकार घडला. या सामन्यात इंडिया बीने इंडिया एला 108 धावांनी नमवले.

या सामन्यात इंडिया बीचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही बाबतीत आपले वर्चस्व ठेवले. दरम्यान या सामन्यात एक अजब प्रकार घडला, जेव्हा फलंदाजाला त्याचा अतिआत्मविश्वास नडला, आणि त्याची किंमत संघाला भोगावी लागली. इंडिया बी संघाचा कर्णधार पार्थिव पटेलनं इंडिया एचा फलंदाज जयदेव उनाडकटला एका भलत्याच अंदाजात बाद केले. हा रन आऊट पाहून चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.

उनाकटची बेजबाबदार खेळी

इंडिया एच्या 43व्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटनं शाहबाज नदीमच्या चेंडूवर बचावात्मक खेळी केली. दरम्यान तो क्रिझ सोडून पुढे निघून गेला. हा चेंडू कव्हरजवळ असलेल्या केदार जाधवकडे गेला. यावेळी उनाडकटचे चेंडूकडे लक्ष नव्हते, त्यामुळं तो क्रिझच्या बाहेर गेला. पार्थिवनंही चपळता दाखवत जयदेवला बाद केले. दरम्यान जयदेवला काय झाले ते कळलेच नाही. जयदेवनला नाराज होत मैदान सोडावे लागले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोनीनं आपल्या करिअरमध्ये अनेकवेळा अशी कामगिरी केली आहे.

इंडिया बीचा मोठा विजय

या सामन्यात इंडिया बीनं अगदी सहजरित्या इंडिया एला नमवले. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या इंडिया बीनं 50 ओव्हरमध्ये 302 धावा केल्या. यात सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडनं 113 तर बाबा अपाराजितनं 101 धावांची तुफानी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया बीच्या संघाला केवळ 194 धावा करता आल्या. इंडिया बीकडून हनुमा विहारीला 59 धावा करता आल्या. तर, इशान किशन, देवदत्त पड्डीकल, अभिमन्यु ईस्वरन, विष्णु विनोद सारखे फलंदाज फ्लॉप झाले.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading