'धोनीच्या एका जागेसाठी 27 विकेटकिपरसोबत असते गळेकापू स्पर्धा', क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

भारतीय संघात विकेटकिपर म्हणून कोणाला संधी मिळावी यासाठी स्पर्धा सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 05:00 PM IST

'धोनीच्या एका जागेसाठी 27 विकेटकिपरसोबत असते गळेकापू स्पर्धा', क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारतीय संघात विकेटकिपर म्हणून कोणाला संधी मिळावी यासाठी स्पर्धा सुरू आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संघाकडे सध्या कोणताही चांगली विकेटकिपर फलंदाज नाही आहे. ऋषभ पंतच्या खराब कामगिरीमुळं इतर फलंदाजही तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला चांगला विकेटकिपर शोधण्यासाठी अडचणी येत आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे भारताचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप 2019नंतर क्रिकेटपासून लांब आहे. वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धोनीचा संघात समावेश नव्हता. त्यातच आता ऋषभ पंतलाही अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यामुळं भारताच्या विकेटकीपर जागेसाठी चांगला पर्याय शोधण्याचे काम निवड समितीला करावे लागणार आहे. या सगळ्याबाबत भारताला विकेटकीपर फलंदाज म्हणून असंख्य सामने जिंकून दिलेल्या पार्थिव पटेलनं एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

27 विकेटकीपरसोबत असते स्पर्धा

विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या संघाला शानदार प्रदर्शन करत सामना जिंकून देणाऱ्या पार्थिव पटेलनं संघात येण्याबाबत एक धक्कादायक विधान केले आहे. जर, भारतीय संघात आपली जागा निर्माण करण्यासाठी कोणाला प्रयत्न करायचे असतील तर त्यांना 27 विकेटकीपरशी स्पर्धा करावी लागले, असे विधान केले. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पार्थिवनं हा खुलासा केला. त्याचबरोबर, “मी 34 वर्षांचा आहे, त्यामुळं माझ्याकडे कोणाच्या नजरा नाही आहेत”, असे मतही व्यक्त केले.

धोनीची जागा कोणी नाही घेऊ शकत

Loading...

जानेवारी 2018मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या पार्थिव पटेलनं घरेलु क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे धोनी. मात्र, धोनीमुळेच संघाबाहेर गेलेल्या पार्थिवनं धोनीची जागा घेणं सोपे नसल्याचे मत व्यक्त केले आहे. .

VIDEO : पडळकर भाजपात येताच मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Sep 30, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...