सामना संपल्यावर रुग्णालयात जातो पार्थिव पटेल

सामना संपल्यावर रुग्णालयात जातो पार्थिव पटेल

आरसीबीने सामन्यानंतर पार्थिव पटेलला घरी जाण्याची परवानगी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल सध्या तणावाचा सामना करत आहे. त्याला आयपीएल 2019 मध्ये संघासाठी तर घरी वडिलांसाठी धावपळ करावी लागत आहे.

पार्थिव पटेलचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे फेब्रुवारीपासून अहमदाबादमधील एका रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर पार्थिवला संघासोबत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागते. अशावेळी वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तो फोनवरून संपर्क करत असतो. सामना संपल्यानंतर जेव्हाही तो फोन पाहतो तेव्हा तो उचलण्याची भीती वाटते असंही त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

आरसीबीने सामन्यानंतर पार्थिव पटेलला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. सामना संपल्यानंतर शक्य असेल तेव्हा तो वडिलांना पाहण्यासाठी रूग्णालयात जातो. तिथून पुढच्या सामन्याच्या अगोदर तो संघात दाखल होतो.

पार्थिवने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सामना खेळत असताना डोक्यात काही नसतं. पण जेव्हा सामना संपतो तेव्हा घराबद्दल विचार सुरू होतात. सकाळी उठताच वडिलांच्या तब्येतीबद्दल विचारतो. डॉक्टरासोबत चर्चाही करतो. कधी कधी कठिण निर्णय घ्यायचे असतात. घरी आई आणि बायको असली तरी शेवटी मला विचारलं जातं. सुरुवातीच्या दिवसात कृत्रिम श्वाच्छोश्वास सुरू ठेवायचा का? किती ऑक्सिजन द्यायचा यांसारखे निर्णय घ्यावे लागले. ज्या दिवशी सामना असायचा त्यादिवशी माझे लक्ष विचलित होऊ नये म्हणून कुटुंबीय निर्णय घ्यायचे आणि सामन्यानंतर मला सांगायचे.

पार्थिव पटेल आरसीबीच्या संघातून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो. यंदाच्या हंगामात त्याने सहा सामन्यात 172 धावा केल्या आहेत. यात एका सामन्यात 67 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 08:40 AM IST

ताज्या बातम्या