मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये कॉमेंट्री करणाऱ्या भारतीय खेळाडूचं Instagram Account Hack

T20 World Cup मध्ये कॉमेंट्री करणाऱ्या भारतीय खेळाडूचं Instagram Account Hack

नवनवीन तंत्रज्ञान हे दुधारी तलवार असते, अनेकवेळा यामुळे सुविधा मिळतात, पण काही वेळा अडचणींचाही सामना करवा लागतो. भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल (Parthiv Patel) यालाही हाच अनुभव आला आहे.

  • Published by:  Shreyas
दुबई, 17 ऑक्टोबर : नवनवीन तंत्रज्ञान हे दुधारी तलवार असते, अनेकवेळा यामुळे सुविधा मिळतात, पण काही वेळा अडचणींचाही सामना करवा लागतो. भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल (Parthiv Patel) यालाही हाच अनुभव आला आहे. भारताकडून 65 मॅच खेळलेल्या पार्थिव पटेल याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक (Instagram Account Hack) झालं आहे. पार्थिवने स्वत: ट्वीट करून याची माहिती दिली आहे. 36 वर्षांच्या पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, सोबतच त्याने आयपीएललाही अलविदा केलं आहे. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर पटेल कॉमेंट्री करताना दिसतो. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) मॅचदरम्यान कॉमेंट्री करताना पार्थिव पटेलने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. 'प्लीज लक्ष द्या, माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. मला ते ओपन करता येत नाहीये. जोपर्यंत अकाऊंट रिस्टोर होत नाही, तोपर्यंत या अकाऊंटवरून काही मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा,' असं ट्वीट पार्थिव पटेलने केलं आहे. Parthiv Patel Tweet 2002 साली पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी पार्थिवने पहिली टेस्ट खेळली, जे आजही एक रेकॉर्ड आहे. पार्थिव पटेलने भारताकडून 25 टेस्ट, 38 वनडे आणि 2 टी-20 खेळल्या. निवृत्ती घ्यायच्या आधी तो आयपीएलच्या सहा टीमकडून खेळला होता.
First published:

पुढील बातम्या