मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'टीमला सांगण्यापेक्षा तुमचं वर्तन सुधारा';दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला CSK फॅन्सने सुनावले खडेबोल

'टीमला सांगण्यापेक्षा तुमचं वर्तन सुधारा';दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला CSK फॅन्सने सुनावले खडेबोल

दिल्ली कॅपीटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांना ट्विटवरुन CSK फॅन्सने केले ट्रोल

दिल्ली कॅपीटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांना ट्विटवरुन CSK फॅन्सने केले ट्रोल

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (DC vs CSK)) शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. याचसह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (DC vs CSK)) शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. याचसह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यांच्या या विजयामुळे क्रिकेट जगतातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपीटल्स टीमचे मालक पार्थ जिंदाल(parth jindal) यांनीही टीमचे कौतुक केले पण बॅटिंग आणि ब़ॉलिंग सुधण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी दिलेल्या या सल्ल्यावरुन चेन्नई सुपरकिंग्सच्या CSK फॅन्सनी एक फोटो शेअर करत खडेबोल (I hope your friends improve their behavior as well parth)सुनावले आहेत.

IPL 2021: CSK ला 'या' खेळाडूवर 9 कोटी खर्च करणं पडलं महागात, आली पश्चातापाची वेळ

दिल्ली कॅपिटल्स टीमचे मालक पार्थ जिंदाल यांनी ट्विट करत ''प्ले ऑफ होण्यापूर्वी बॅटिंग सुधारायला हवी. त्यासाठी आपल्याकडे खुप वेळ आहे. तसेच, बॉलिंग उत्कृष्ट होती. फलंदाजांनी 137 रनांचे आव्हान पार करण्यासाठी चांगले प्रदर्शन केले. पण काही शॉट आणि विकेट गमावल्या. असो, यावर आता काम करा. @DelhiCapitals अभिनंदन''. असे म्हटले आहे.

मात्र, त्यांनी दिलेल्या या सल्ल्यावरुन चेन्नई सुपरकिंग्सच्या CSK फॅन्सनी एक फोटो शेअर करत खडेबोल सुनावले आहेत. CSK च्या एका फॅन्सने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये CSK चे काही प्रमुख अधिकारी ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसत आहेत. तेव्हा, दिल्ली कॅपीटल्स टीमचे काही सहकारी त्यांनी चिडवतानी दिसत आहेत. CSK फॅन्सच्या मते त्यांनी असभ्य वर्तन केले आहे.

हा फोटो शेअर करत टीमला सांगण्यापेक्षा तुमचे वर्तन सुधारा असे म्हटले आहे. ''मला आशा आहे की तुमचे मित्र त्यांचे वर्तन सुधारतील पार्थ'' सध्या हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नईविरुद्धच्या या विजयासोबतच दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 13 पैकी 10 सामने जिंकले तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या खात्यात सध्या 20 पॉईंट्स आहेत, त्यामुळे आता ते पॉईंट्स टेबलमध्ये टॉप-2 टीममध्ये राहणार हे निश्चित झालं आहे. टॉप-2 मध्ये राहिल्यामुळे दिल्लीला प्ले-ऑफमध्ये दोनदा खेळण्याची संधी मिळणार आहे.

आयपीएल प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दिल्ली, चेन्नई आणि आरसीबी क्वालिफाय झाल्या आहेत, तर कोलकाता, राजस्थान आणि मुंबई यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा सुरू आहे.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021