Home /News /sport /

Padma Awards : देवेंद्र झझारियाला पद्म भूषण, गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'पद्मश्री'ने गौरव!

Padma Awards : देवेंद्र झझारियाला पद्म भूषण, गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'पद्मश्री'ने गौरव!

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भाला फेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) पद्मश्री पुरस्काराने (Padma Awards) सन्मानित करण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 25 जानेवारी : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भाला फेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) पद्मश्री पुरस्काराने (Padma Awards) सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय पॅरा ऍथलिट देवेंद्र झझारियाला पद्म भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. 40 वर्षांच्या झझारियाला 2004 अथेन्स आणि 2016 रियो पॅरालिम्पिकमध्ये भाला फेक प्रकारात गोल्ड मेडल मिळालं होतं. तर टोकयो पॅरालिम्पिकमध्ये त्याने F46 इव्हेंटमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलं. 24 वर्षांच्या नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. तसंच अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक गोल्ड मेडल मिळवणारा तो दुसरा भारतीय आहे. पॅरा शूटर अवनी लेखरा, पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि पॅरा भाला फेकपटू सुमित अंटील यांनाही पद्मश्री देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय 93 वर्षांचे कलारिपयाटू हे भारतीय मार्शल आर्ट खेळणारे महान खेळाडू शंकरनारायण मेनन चुंडायील, माजी आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियन फैसल अली दार, 67 वर्षांचे माजी फूटबॉलपटू आणि कर्णधार ब्रम्हानंद संखवालकर आणि 29 वर्षांची महिला हॉकीपटू वंदना कटारिया यांचाही पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण केलं जातं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या