चेंडू कुडतडल्याप्रकरणी पाकच्या ‘विराट’वर संकटांचे ढग, होणार कारवाई

चेंडू कुडतडल्याप्रकरणी पाकच्या ‘विराट’वर संकटांचे ढग, होणार कारवाई

पाकचा 'विराट कोहली' आला गोत्यात, संघाच्या अडचणी वाढल्या.

  • Share this:

इस्लामाबाद, 1 नोव्हेंबर : बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसनवर मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाल्याचे आयसीसीपासून लपवल्यामुळं कारवाई करण्यात आली आहे. आता याचबरोबर पाकिस्तान संघालाही मोठा दणका बसला आहे. पाकच्या संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी एक मोठी बातमी आली आहे. संघाचा अनुभवी फलंदाज आणि पाकचा विराट कोहली म्हणून ओळख असणारा खेळाडू चेंडू कुडतडल्याप्रकरणी दोषी ठरवला गेला आहे.

दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला चेंडू कुडतडल्या प्रकरणी शिक्षा झाली होती. आता क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज अहमद शहजादच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसारखी शैली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूवर आता मोठी कारवाई होऊ शकते. शहजादवर पाकिस्तानध्ये झालेल्या आझम ट्रॉफी दरम्यान चेंडू कुडतडल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान त्याच्यावरचा हा आरोप आता सिध्द झाला आहे.

वाचा-पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, आज होणार भारत-पाक सामना

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अहमद शहजादवर कारवाई करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच बोर्ड त्याला शिक्षा सुनावू शकते. पीसीबीनं दिलेल्या माहितीत, “फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियममध्ये सेंट्रल पंजाब आणि सिंध यांच्यात झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात सेंट्रल पंजाबचा कर्णधार अहमद शहजाद बॉल टेम्परिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आला आहे. या सामन्यात त्यानं चेंडूसोबत छेडछाड केल्याचा आरोप होता”, असे सांगितले.

वाचा-भारतीय संघाला मोठा झटका, सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी

याआधीही शहजादचा रेकॉर्ड आहे खराब

शहजादनं (Ahmed Shehzad)2009मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र त्यानंतर त्याला आपली जागा टिकवता आली नाही. शहजादचा पहिल्यापासून नियमांचे पालन करण्याबाबत कमी पडला आहे. त्यामुळं वादात पडण्याची त्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी डोपिंग प्रकरणी त्याच्यावर चार महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

शहजादचा क्रिकेटमधला रेकॉर्ड

शहजादला नुकत्याच झालेल्या श्रीलंका विरोधातल्या सामन्यात पाक संघात संधी दिली होती. मात्र या सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात त्याला संघात जागा देण्यात आलेली नाही. श्रीलंका विरोधात शहजादनं दोन सामन्यात 13 आणि 4 धावा केल्या. दरम्यान 27 वर्षीय शहजादने पाकिस्तानकरिता 13 टेस्ट, 81 वनडे आणि 59 टी-20 सामने खेळले आहेत.

वाचा-आत्मविश्वासनं फलंदाजाचा केला घात, पाहा क्रिकेटमधल्या अजब रनआऊटचा VIDEO

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First published: November 1, 2019, 5:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading