सामन्यावेळी मैदानावरच पंचांचा मृत्यू, क्रिकेट जगतात हळहळ

सामना सुरू असताना मैदानावरच पंच कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 06:39 PM IST

सामन्यावेळी मैदानावरच पंचांचा मृत्यू, क्रिकेट जगतात हळहळ

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर जखमी झाला होता. त्यानंतर लगेच त्याला मैदान सोडावं लागलं होतं. सोमवारी पाकिस्तानी क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी घटना घडली.

पाकिस्तानमध्ये  एका क्लब क्रिकेट सामन्यावेळी पंचांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने पंच मैदानावर कोसळले. पाकिस्तानी पंच नसीम शेख एका क्लब स्पर्धेत सामन्यावेळी अंपायरिंग करत होते. त्यावेळीच ते मैदानावर अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.नसीम शेख मैदानावर कोसळताच सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली. स्ट्रेचरवरून त्यांना मैदानाबाहेर नेण्यात आलं. तिथून रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यापूर्वीच 56 वर्षीय नसीम यांचा मृत्यू झाला होता.

याआधी गोव्यात 13 जानेवारीला एका फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. बंगालच्या एका ज्य़ुनिअर खेळाडूचाही अशाच प्रकारे मैदानावर कोसळून मृत्यू झाला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजेस याचा उसळता चेंडू लागून मृत्यू झाला होता.

वाचा : जहीरला शुभेच्छा देतानाची फिरकी पांड्याला महागात, चाहत्यांनी घेतलं फैलावर

वाचा : टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

Loading...

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Oct 8, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...