नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारतात जसं क्रिकेटला धर्म मानला जातो, अशीच परिस्थिती इतर देशांमध्येही आहे. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येही क्रिकेटची पूजा केली जाते. मात्र, काहीवेळा क्रिकेटर अशा ऊंचीवर पोहचतात की त्यानंतर त्यांना मागे वळून पाहायची गरज नसते. अशी परिस्थिती सर्व क्रिकेटरची असते असेही नाही. काहींना आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी गेल्यानंतरही संघात जागा मिळत नाही असाच प्रकार पाकिस्तानच्या खेळाडूबाबत घडला.
एकेकाळी पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र आता अशी परिस्थिती आली आहे, की त्याल पिक-अप ट्रक चालवावा लागत आहे. ही गोष्ट आहे, पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या फझल शुभान.
फजल शुभान हा 31 वर्षांचा असून अंडर-19 क्रिकेटमध्ये त्यानं आपला दहशत निर्माण केली होती. त्याच्या याच खेळीच्य जोरावर त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातही स्थान मिळणार होते. मात्र त्याची संधी हुकली, आणि आता हाच फजल पाकिस्तानमध्ये पिक-अप ट्रक चालवत आहे.
काही दिवसांपूर्वी फझलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर लोकांनी त्याची दखल घेण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये फजल मिनी पिक-अप ट्रक चालवताना दिसत आहे. दरम्यान एका मुलाखतीत फझलनं, “पाकिस्तानी संघात जागा मिळावी म्हणून मी खुप मेहनत केली. मात्र माझी निवड झाली नाही, दुसऱ्याच खेळाडूंना संघात जागा दिली”, असे सांगितले.
वाचा-मालिका विजयानंतरही विराटनं आफ्रिकेला दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला...
SAD STORY OF 🇵🇰 🏏
Fazal Subhan was the player of HBL, he has played U19 & A side cricket for Pakistan, he was contender of Pak Test team,
After closing of Departmental cricket he is driving drive
“BHARE KE SUZUKI”
His salary was 1 lac & now earning is less then 40k
😭 😭 😭 pic.twitter.com/nq22vPY55v
— Shoaib Jatt (@Shoaib_Jatt) October 11, 2019
वाचा-कॅप्टन कोहलीचा स्पेशल रेकॉर्ड, 50वा कसोटी सामना ठरला खास
फझल शुभानची कामगिरी
फझलनं 40 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात 32.87च्या सरासरीनं 2301 धावा केल्या आहेत. तर, 29 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात 23.53च्या सरासरीनं 659 धावा केल्या आहेत. तर, 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं 14.50च्या सरासरीनं 87 धावा केल्या. त्यामुळं त्याला संघात जाग मिळाली नाही. फझलनं शेवटचा अंतिम सामना 2018मध्ये खेळला होता.
वाचा-शमीची 'बोल्ड' कामगिरी, कसोटी क्रिकेटमध्ये घडवला इतिहास
VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात