'सरफराजचं कर्णधारपद काढून घ्या नाहीतर...', माजी क्रिकेटर भडकला

'सरफराजचं कर्णधारपद काढून घ्या नाहीतर...', माजी क्रिकेटर भडकला

वर्ल्ड कप 2019मध्ये मानहानीकारक पराभव स्विकारलेल्या पाकिस्तान संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे.

  • Share this:

कराची, 26 जुलै : वर्ल्ड कप 2019मध्ये मानहानीकारक पराभव स्विकारलेल्या पाकिस्तान संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. कारण 2015मध्ये सेमीफायनपर्यंत पोहोचणारा पाकिस्तानचा संघ 2019मध्ये पहिल्याच फेरीत बाहेर गेला. लीग स्टेजमधील पाकिस्तानने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले पण त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही. याआधी पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तान संघाला नव्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले होते. आता माजी पाकिस्तानी खेळाडूने सर्फराजला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत वक्तव्य केले आहे.

वर्ल्ड कप 2019मध्ये पाकिस्तानचा संघ जिंकण्यासाठी लढतच नव्हता, खेळाडू फक्त दिवसाढवळ्या स्वप्न पाहत होते. त्यामुळं आता सरफराजकडून कर्णधारपद काढून घेण्यात जास्त वेळ घालवू नका. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ठरवेल काय करायचं ते पण बोर्डाने जुन्या संघावर विश्वास ठेवला पाहिजे. सध्या पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य असुरक्षित असे, असे रोखठोक मत पाकचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने व्यक्त केले.

सरफराजच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

कामरान अकमलनं, "पीसीबीनं सरफराजचे रेकॉर्ड पाहिले आहे. मी यावर काही बोलणार नाही. मात्र पुढच्या भवितव्यासाठी पाकिस्तानला नव्या कर्णधाराची गरज आहे", असे मत व्यक्त केले. तसेच, "त्यामुळे कोणावरही कोणतीही दया-माया दाखवता त्यांच्या कामगिरीची चौकशी आणि समीक्षा करावी", असे सांगितले.

वाचा- विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

2 ऑगस्टला सरफराजच्या कर्णधारपदावर निर्णय होणार

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाच्या खराब खेळीवर पीसीबी 2 ऑगस्टला बैठक घेणार आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित मोठे निर्णय घेतले जातील. त्यामुळं सरफराजच्या कर्णधारपदावरही याच दिवशी निर्णय होईल.

वाचा- Global T20 Canada 2019 : आऊट नसतानाही युवीनं सोडलं मैदान, चाहते भडकले; पाहा VIDEO

वाचा-...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही

VIDEO: गर्लफ्रेंडच्या घरी सापडला नवरा, संतापलेल्या बायकोनं केली दोघांची धुलाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 01:37 PM IST

ताज्या बातम्या