वाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव

वाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने भारत पाकिस्तान वाघा वाॅर्डरवर विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलंय.

  • Share this:

21 एप्रिल : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने भारत पाकिस्तान वाघा वाॅर्डरवर विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलंय. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

पाकिस्तानी टीम इंग्लंड-आयरलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या आधी पाकची टीम वाघा बाॅर्डरवर पोहोचली. खेळाडूंमध्ये उत्साह वाढावा यासाठी पाकिस्तानच्या टीमला वाघा बाॅर्डरवर नेण्यात आलं होतं.

पण जेव्हा ही टीम वाघा बाॅर्डरवर पोहोचली तेव्हा हसन अली स्वता:हाला रोखू शकला नाही. त्याने वाघा बाॅर्डरच्या मध्यभागी येऊन जवानांप्रमाणे कवायत सुरू केली. ज्या प्रकार दोन्ही देशाकडील जवान ऐकमेकांना पाहून दम भरतात तसाच अवतार हसन अलीचा पाहण्यास मिळाला. त्याने भारतीय जवानांकडे पाहून विचित्र हावभावही केले.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पाकिस्तानमध्ये मोठ्या अभिमानाने हा व्हिडिओ पाहिला जातोय तर भारतात हसन अलीच्या या कृत्यावर हास्यकल्लोळ उडाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 09:32 PM IST

ताज्या बातम्या