दुबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्डकप (T20World Cup) स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड विरद्धच्या पराभवानंतर टीम इंडियावर (IND vs NZ) जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरदेखील (Shoaib Akhtar) मागे राहिला नाही. मैदानावर क्रिकेट खेळणार की इन्स्टाग्रामवर? असा सवाल करत अख्तर टीम इंडियाचा खरपूस समाचार घेतला आहे.
टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठीची दावेदारी सिद्ध करण्यासाठी भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा होता. पण 8 विकेट्सनं पराभव झाला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पण फ्लॉप ठरल्याचे दिसून आले.
टीम इंडियाच्या या निराशजनक कामगिरीनंतर टीम इंडियाची कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. टीम इंडियाच्या पराभवा
नंतर शोएबने नाराजी व्यक्त करत भारतीय खेळाडूंना खोचकरित्या ‘तुम्हाला मैदानावर क्रिकेट खेळायचं आहे की इन्स्टाग्रामवर?’ असा सवाल उपस्थित केला आहे.तो म्हणाला, मला समजत नाही ते असे कसे खेळू शकतात. तुम्ही टॉस हारलात म्हणजे जीवन संपत नाही.
माझ्या मतेतरी नाणेफेक गमावल्यानंतरच टीम इंडियाने हत्यारं टाकली होती. फलंदाजीतही अतिशय खराब शॉट्स खेळले. शमीनेही उशीरा बोलिंग केली. तर शार्दूलने खास प्रदर्शन केलं नाही. त्यामुळे या सर्वानंतर तरी नीट आत्मपरीक्षण करुन सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल आणि विचार करावा लागेल की तुम्हाला मैदानावर क्रिकेट खेळायचंय की इन्स्टाग्रामवर?’ असे गंभीर मत मांडत कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील काही काळापासून सोशल मीडिया आणि जाहीरातींमध्ये भारतीय क्रिकेटपटू अधिक वेळ घालवत असल्याचे दिसून येत असल्याने त्यावरुनच शोएबने ही टीका केली असावी.
शोएब अख्तरसोबतच शाहिद आफ्रिदीनंही भारतीय संघावर निशाणा साधला. आता एखादा चमत्कारचं भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचवू शकतो, असं शाहिद आफ्रिदीनं ट्विटमध्ये म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india