बांऊसर लागल्यामुळे पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

बांऊसर लागल्यामुळे पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

14 ऑगस्टला तो पाकिस्तानच्या लिस्ट ए या डोमेस्टिक टुर्नामेंटमध्ये क्वेटा बियर्सकडून खेळत होता. खेळत असताना त्याच्या डोक्यावर बॉल लागून तो जखमी झाला होता.

  • Share this:

पाकिस्तान,16 ऑगस्ट: बांऊसरचा बॉल डोक्यावर लागल्यामुळे जुबैर अहमद या तरूण पाकिस्तानी क्रिकेटरचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. जेव्हा जुबैरला बॉल लागला तेव्हा त्याने हेल्मेट घातलं नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचंही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे.

जुबैर अहमद हा पाकिस्तानच्या मर्दानाचा रहिवाशी होता. 14 ऑगस्टला तो पाकिस्तानच्या लिस्ट ए या डोमेस्टिक टुर्नामेंटमध्ये क्वेटा बियर्सकडून खेळत होता. खेळत असताना त्याच्या डोक्यावर बॉल लागून तो जखमी झाला होता. यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पीसीबीने ट्विट करून दिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्यूजचाही मृत्यूही अशाचप्रकारे 2014 साली झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 05:34 PM IST

ताज्या बातम्या