पाकच्या गोलंदाजावर भारतीय संस्कार! फलंदाजाला बाद करताच करतो 'हे' काम, पाहा VIDEO

पाकिस्तानच्या गोलंदाजानं दाखवले भारतीय संस्कार, पाहा हा VIRAL VIDEO.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 10:13 AM IST

पाकच्या गोलंदाजावर भारतीय संस्कार! फलंदाजाला बाद करताच करतो 'हे' काम, पाहा VIDEO

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांचे परस्पर कट्टर विरोधाक आहेत. मैदानात किंवा मैदानाबाहेर या दोन्ही संघांमध्ये आणि चाहत्यांमध्ये नेहमीच युध्दाचे वातावरण असते. मात्र फाळणीच्या आधी भारताचाच भाग असलेल्या पाकिस्तानमध्ये सांस्कृतिक गोष्टींमध्ये साम्य आहे. भारत-पाक यांच्यात बरेच साम्यही आहे. एवढेच नाही तर पंजाब आणि सिंध परिसरातले लोक पंजाबीच भाषा बोलतात. त्यामुळं सध्या पाकच्या खेळाडूवर असलेल्या भारतीय संस्कारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 नोव्हेंबरला टी-20 मालिका होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका होणार आहे. कसोटी आणि टी-20 संघामध्ये पाकिस्तानकडून 16 वर्षीय नसीम शाहची निवड केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नसीम शाहनं केवळ 6 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात 26 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-‘3 तासांच्या टी-20 सामन्यानं मरणार नाहीत’, प्रदूषणावरून प्रशिक्षकानं सुनावलं

या सगळ्यात नसीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नसीम फलंदाजाला बाद केल्यानंतर एका भलत्याच प्रकारे सेलिब्रेशन करतो. नसीम चक्क फलंदाजांना बाद केल्यानंतर त्यांना नमस्कार करतो. फलंदाजां नमस्ते करत त्यांना सन्मानानं मैदानाबाहेर पाठवतो.

दरम्यान, याआधी आपण फलंदाजांना बाद केल्यानंतर गोलंदाज राग व्यक्त करताना पाहिले असेल. मात्र या 16 वर्षीय गोलंदाजाचे हे संस्कार पाहून सर्वच अचंबित झाले आहेत.

वाचा-BCCIच्या इनिंगमध्ये गांगुलीला हवी मास्टर ब्लास्टरची साथ, सचिनला देणार मोठी ऑफर

मिस्बाहनं केले होते नसीमचे कौतुक

पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल-हकनं नसीमला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सामिल करण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याचे कौतुक केले होते. मिस्बाहनं, “आम्ही त्यांची शैली पाहून त्याला संघात स्थान दिले आहे. पाहुया आता तो ऑस्ट्रेलियामध्ये कशी गोलंदाजी करतो. ऑस्ट्रेलियाच्या मैदानांचा त्याला फायदा होईल. नव्या आणि जुन्या चेंडूनं तो चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यामुळं त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहे”, असे सांगितले.

वाचा-'अरे पुढच्यावेळी तुलाही घेऊन जातो', अजिंक्यनं घेतली रोहितची फिरकी

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2019 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...