मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Pak T20 Match : राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय महिला टीमची कमाल, पाकिस्तान 99 धावांवर ऑलआऊट

Ind vs Pak T20 Match : राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय महिला टीमची कमाल, पाकिस्तान 99 धावांवर ऑलआऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर तिच्या व्यतिरिक्त शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर तिच्या व्यतिरिक्त शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर तिच्या व्यतिरिक्त शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट खेळी केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Birmingham, India

बर्मिंगहॅम, 31 जुलै : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाविरुद्ध लढत आहे. पावसामुळे ओल्या मैदानामुळे टॉस उशिराने झाला. पाकिस्तानने हा टॉस जिंकला असून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला बाद करत 99 धावांवर रोखलं आहे. हा सामना 18 षटकांचा झाला.

भारताकडून स्नेह राणा आणि यांनी प्रत्येक दोन तर, रेणुका सिंग, मेघना सिंग आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर तीन फलंदाज या धावबाद झाल्या. पाकिस्तानकडून सर्वाधिक 32 धावा मुनीबा अली हिने केल्या. तिने चार चौकार आणि एक षटकार लगावला.

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने पदक तालिकेत खाते उघडले आहे. शनिवारी 30 जुलैला भारताला सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळाले. आता ज्याची सर्वजण वाट पाहत होते असा सुपर संडेचा सामना होत आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 सामना सुरू झाला आहे. राष्ट्रकुलमधील टीम इंडियाचा हा दुसरा सामना आहे. भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकल्यावर आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उशिरा टॉस झाल्यानंतर हा सामना 18 षटकांचा खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाकडून हरला आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे लागल्या आहेत. तसेच, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया येथे जबरदस्त विजय मिळवेल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला लागली आहे. दरम्यान, आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघादरम्यान, 11 सामने खेळले गेले आहेत. त्यात भारताने 9 तर पाकिस्तानने फक्त 2 सामने जिंकले आहे.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा स्मृती मानधना हिच्यावर आहेत.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर तिच्या व्यतिरिक्त शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट खेळी केली होती. तर पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या 4 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे.

भारतीय संघ : स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिगेज़, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ति शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, मेघना सिंह, रेणुका सिंह, स्नेह राणा, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, तानिया भाटिया

पाकिस्तानचा संघ : इरम जावेद, मुनीबा अली, ओमैना सोहेल, बिस्माह मरूफ, निदा डार, ए. रियाज़, आयशा नसीम, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन, ऐमान अनवर, कायनात इम्तियाज़, सादिया इकबाल, गुल फिरोज़ा

First published:

Tags: Cricket news, India vs Pakistan, T20 cricket