नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या (Indian Premier League T-20 Cricket) जाहिरातीही टीव्हीवर दिसू लागल्या आहेत. क्रिकेटचा फीव्हर हळूहळू चढू लागला आहे. त्यातच पाकिस्तानातून एक बातमी आली आहे. पाकिस्तानातील एका वन-डे क्रिकेट सामन्यात स्पिनर गुलाम फातिमाने (Ghulam Fatima) असा बॉल टाकला की तो पाहून ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नची (Shane Warn) आठवण संपूर्ण क्रिकेट जगताला झाली.
फातिमाच्या या बॉलचा व्हिडीओ तिनेच तिच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. तो आता प्रचंड व्हायरल होत असून फातिमाच्या बॉलिंगचं खूप कौतुक होत आहे. पाकिस्तानात सध्या महिलांसाठी पाकिस्तान कप वन-डे क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पीसीबी डायनामाइट्सविरुद्ध पीसीबी स्टायकर्स हा क्रिकेट सामना 13 सप्टेंबर 2021 ला कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium Karachi) झाला.
या सामन्यात डायनामाइट्सची लेग स्पिनर गुलाम फातिमाने एक बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप टाकून तो इतका जबरदस्त आत विकेट्सवर वळवला की टप्पा आउट साइड द ऑफ स्टंप पडला असला तरीही बॉलने लेग स्टंपचा वेध घेतला आणि स्टायकर्सची डावखुरी बॅट्सवूमन फरिहा क्लिन बोल्ड झाली. फरिहाने 68 बॉल्समध्ये 43 रन्स केल्या.
फातिमाने टाकलेला बॉल महान स्पिनर शेन वॉर्नने टाकलेल्या बॉल सारखाच होता. शेननेही आउट साइड द ऑफ स्टंप बॉल टाकून डावखुऱ्या बॅट्समनच्या लेगस्टंपचा वेध घेतला होता. या बॉलला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ (Ball of the century)म्हटलं जातं. अजूनही क्रिकेट विश्वात रसिकांच्या मनात तो बॉल, तो क्षण इतका ताजा आहे की जणू काही दिवसांपूर्वीच शेन वॉर्नने ती विकेट घेतली असावी असं वाटतं.
That ball To Fareeha: Ghulam Fatima 2-35 at National Stadium, Karachi ##BackOurGirls #HarHaalMainCricket pic.twitter.com/sya89uqKe6
— Ghulam Fatima (@ghulamfatima_14) September 12, 2021
फातिमाने या सामन्यात 35 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या पण तिचा पीसीबी डायनामाइट्स संघ मात्र मॅच जिंकू शकला नाही. पण फातिमाच्या बॉलिंगचं मात्र जगभरात कौतुक होत आहे. तिनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने टाकलेल्या बॉलचा व्हिडीओ, मूळचा शेन वॉर्नच्या बॉलिंगचा व्हिडीओ (Viral Video) एकत्रितपणे टाकल्याचं दिसत आहे. त्यामुळे पाहणाऱ्यांना फातिमाच्या बॉलिंगचं महत्त्व लक्षात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.